नांदेड(Nanded) :- मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र(Kunbi certificate) रद्द करा, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मागील पाच दिवसापासून ओबीसी बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.
मोर्चा काढत दिली ‘हिमायतनगर बंद’ची हाक
आज याच मागणीसाठी ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आहेत. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे ओबीसी बांधवानी मोर्चा काढत हिमायतनगर कडकडीत बंद ठेवले. दरम्यान मागील अकरा दिवसापासून ओबीसी आंदोलक दत्तात्रय आनंतवार यांनी हदगाव तालुक्यातील कवाना या गावी आमरण उपोषण सुरू केले आहे. दत्तात्रय आनंतवार यांची (health) तब्बेत खालावली आहे. शासनाने अद्याप दत्तात्रय आनंतवार यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे ओबीसी बांधव आता आक्रमक झाले असून दत्तात्रय आनंतवार यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी आणि मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करावेत अशी मागणी ओबीसी बांधवांनी केलीय.