मंडळ अधिकारी व तलाठ्यावरील निलंबनाची कार्यवाही
हिंगोली (Talathi Andolan) : अवैध गौणखनिज प्रकरणात मंडळ अधिकारी के.एन. पोटे, तलाठी एम.डी.गळाकाटू यांच्यावर निलंबनाची कार्यवाही झाल्याने महाराष्ट्र राज्य तलाठी संघ आक्रमक झाला असून, पंधरा दिवसाच्या आत दोघांना रूजू करून घ्यावे अन्यथा बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य तलाठी संघ जिल्हा शाखा हिंगोलीच्यावतीने १८ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात नमूद केले की, यावर्षी लोकसभा व इतर पोटनिवडणुकीमुळे गौणखनिज कार्यवाहीवर विपरीत परिणाम झाला आहे.
गौणखनिज कार्यवाहीवर पूर्णत: बहिष्कार
केवळ उपोषणकर्त्याच्या मागणीमुळे मंडळ अधिकारी के.एन.पोटे व तलाठी एम.डी.गळाकाटू यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांना पंधरा दिवसाच्या आत कामावर रूजू करून घ्यावे, तलाठी व मंडळ अधिकार्यांवर झालेल्या विनापोलिस संरक्षण, शासकीय वाहन नसतानाही गौणखनिज कारवाया करताना जिवघेणे हल्ले होत असतानाही जिल्ह्यात वेळोवेळी अवैध गौणखनिजाची कार्यवाही करण्यात आलेली असताना (Talathi Andolan) तलाठी व मंडळ अधिकार्यांचे निलंबन केल्याने इतर तलाठी व मंडळ अधिकारी भयभीत झाले आहेत त्यामुळे सर्वांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.
निलंबित केलेले तलाठी व इतर मंडळ अधिकार्यांच्या निलंबनाने रिक्त होणार्या पदाचा पदभार कोणताही (Talathi Andolan) तलाठी व मंडळ अधिकारी घेणार नाही, तसेच कोणालाही जबरदस्तीने सदर पदभार देण्यात येऊ नये, एम.डी.गळाकाटू यांच्याकडे मुळ सज्जा व्यतीरिक्त दोन म्हणजे एकूण तीन सज्जे असतानाही अतिरीक्त सज्जाच्या पदभारामुळे तलाठी निलंबित झाले आहे त्यामुळे रिक्त होणार्या पदाचा पदभार घेण्यास सर्व सज्जा व मंडळाचा अतिरीक्त पदभार नाकारण्यात आला आहे. निवेदनावर अध्यक्ष विनोद ठाकरे, गजानन रणखांब, विनायक किन्होळकर यांच्यासह अनेक तलाठी व मंडळ अधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
मंडळ अधिकारी के.एन.पोटे व तलाठी एस.डी.गळाकाटू यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केल्याने महाराष्ट्र राज्य (Talathi Andolan) तलाठी संघाच्यावतीने १८ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. तलाठी व मंडळ अधिकार्याच्या निलंबनामुळे जिल्ह्यातील गौणखनिज कार्यवाहीवर पूर्णत: बहिष्कार घालण्यात आला असून गौणखनिज बाबत कोणत्याही कार्यवाहीत सहभाग घेणार नाही असा आक्रमक पवित्रा म.रा.तलाठी संघाने घेतला आहे.