कळमनुरी/हिंगोली (Old pension) : जुनी पेन्शन लागु करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वतीने वेळोवेळी विविध प्रकारचे आंदोलन करूनही अद्याप पर्यंत शासनाकडून मागणी मान्य न झाल्याने महाराष्ट्र राज्य (Talathi Union) तलाठी संघटना दि.२९ ऑगस्ट पासून बेमुदत संपावर राहणार असल्याचे लेखी निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघ राज्य सरकारी कर्मचारी सलग्न जुनी पेन्शन योजना (Old pension) लागू करण्याच्या मागणीसाठी दि.२९ ऑगस्ट पासून बेमुदत संप करणार असल्याचे लेखी निवेदन (Talathi Union) तलाठी संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी विभागीय अध्यक्ष जे.जी.देवकर,अध्यक्ष एस.जे. शेवाळकर,सचिव व्ही.व्ही. पतंगे, विनोद ठाकरे,अमोल गंगावणे, बाळासाहेब मोरे,गणेश कमलाकर यादव आदींची उपस्थिती होती