मानोरा तालुकाध्यक्ष म्हणून अरविंद इंगोले यांची निवड!
मानोरा (Taluka President) : भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party) तालुक्यात दोन तालुकाध्यक्ष मंडळ अध्यक्ष करण्यासाठी वाजागाजा करून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, मात्र अद्यापही पोहरादेवी मंडळ तालुकाध्यक्ष पदाची निवड झाली नसल्याने तालुकाध्यक्षाची निवड कधी होणार ? याबाबतच्या चर्चेला भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ता मध्ये उधाण आले आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका (Elections) पार पडणार आहेत. भाजपाने मानोरा तालुक्यासाठी आठ जिल्हा परिषद सर्कल पैकी इंझोरी, कुपटा, गिरोली व तलप बु या चार सर्कलकरिता मानोरा तालुकाध्यक्ष म्हणून अरविंद इंगोले यांची निवड केली आहे. पण पोहरादेवी, शेंदूरजना आढाव, फुलउमरी, आसोला खुर्द या सर्कल करिता अद्यापही तालुकाध्यक्ष जाहीर न झाल्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते (Activists) संभ्रमात पडले आहेत.
महिना भरापूर्वी मानोरा तालुक्यात दोन तालुका अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पक्षाने राबविली
देशात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपा पक्षाकडे पदाधिकारी, कार्यकर्त्याची सध्या तरी मोठी फळी दिसून येत आहे. राज्यात आगामी काळात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहेत. महिना भरापूर्वी मानोरा तालुक्यात दोन तालुका अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पक्षाने राबविली. त्यावेळी इच्छुकांच्या मुलाखती सुध्दा घेण्यात आल्या. दोन पैकी मानोरा तालुकाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. पण पोहरादेवी तालुकाध्यक्ष (Pohradevi Taluka President) पदाची निवड न झाल्यामुळे कधी होणार नियुक्ती याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.