शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना!
तामसा (Tamasa) : शहरातील माध्यमिक व उच्च्च माध्यमिक विद्यालयाच्या नराधम मुख्याध्यापकाने दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सातत्याने बलात्कार (Rape) केला. त्यात ती विद्यार्थिनी गर्भवती राहिल्याचे कळताच नांदेडच्या एका नामांकित डॉक्टरकडे गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली. दस्तूरखुद्द पीडीत मुलीच्या तक्रारी जबाबावरुन तामसा पोलिसांत पोस्को, बेकायदेशीर गर्भपात, ऍट्रॉसिटीसह (Atrocity) इतर कलमांतर्गत 12 रोजी बुधवारी पहाटे 3.30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या खळबळजनक घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशी तामसा येथे उमटले. या घटनेचा पालक व नागरिकांनी तीव्र निषेध (Strong Objection) व्यक्त करीत तामसा कडकडीत बंद ठेवून नराधम शिक्षकाला फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी केली आहे.
बेशुद्ध अवस्थेत केला पाशवी अत्याचार.!
तामसा येथील नामांकित असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक राजूसिंह चौहान (47) याने शाळेतील इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या, एका अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या प्रेमाच्या पाशात पाडले. पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांकडे तो तिच्या हुशारीचे कौतुक करीत होता. तिची पोलीस होण्याची इच्छा पूर्ण करण्याचे वेगवेगळे आमिष दाखवून तिला व तिच्या वडिलांना देखील विश्वासात घेतले होते. एक-दोन वेळा मुख्याध्यापक त्या पीडीत मुलीच्या घरी जावून तुमची मुलगी हुशार आहे. तिला शिकू द्या, असे सांगितल्याने कुटुंबियांचा विश्वास नराधम मुख्याध्यापक चौहान याच्यावर बसला. पोलीस होण्याची अकॅडमी दाखवतो, म्हणून दिवाळीच्या सुट्टीत 28 ऑक्टोबर 2024 रोजी सदर विद्यार्थिनीला त्याने गाडीतून नांदेडला नेले. तामसा अर्धापूर रस्त्यातील अपरंपार घाटात गाडी थांबवून, गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर पाशवी अत्याचार (Brutal Torture) केला. तुझा व्हिडिओ व्हायरल करतो, म्हणून धमकावत पुन्हा तामसा बसस्थानक परिसरातील एका खोलीत अत्याचार केला. कुटुंबीयांना हा प्रकार सांगितल्यास महागात पडण्याची धमकी देत वारंवार अत्याचार चालूच ठेवला. पीडितेने गर्भवती राहिल्याचे नराधम चौहानला सांगितल्यानंतर, तिला शाळेत प्रॅक्टिकलला बोलावून गुंगीचे औषध देत बेशुद्ध अवस्थेत नांदेडला नेले. नामांकित डॉक्टरकडे बेशुद्ध अवस्थेत गर्भपात केला. शहरात मागील तीन दिवसांपासून त्या नराधम मुख्याध्यापकाच्या प्रतापाची चर्चा चालू होती. सदर चर्चा नातेवाईकांच्या माध्यमातून कुटुंबापर्यंत गेली. नराधम मुख्याध्यापकाने दबावतंत्र व राजकीय हस्तक्षेपाचा प्रयत्न केला. शेवटी त्या पीडितेने मंगळवारी रात्री तामसा पोलीस ठाणे गाठून सहाय्यक पोलीस निरीक्षक (Assistant Inspector of Police) कमल शिंदे यांच्याकडे तक्रार केली. फिर्यादीनुसार, बुधवारी पहाटे 3.30 वाजता गुन्ह्याची नोंद झाली. या घटनेमुळे शहरातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून, नराधम कुकर्मा मुख्याध्यापक मंगळवारपासून फरार झाला आहे.
मुख्याध्यापकाला शोधण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान!!
पीडीत विद्यार्थिनीच्या (Student) तक्रारीवरुन नराधम मुख्याध्यापकाविरुद्ध ऍट्रॉसिटी, पोस्को, बेकायदेशीर गर्भपात करणे, बळजबरी अत्याचार करणे, धमकी देणे आदी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस (Sub Divisional Police) अधिकारी शफाकत आमना, सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे करीत आहेत. उल्लेखनीय म्हणजे गुन्हा नोंद करण्यासाठी दहा तास लागल्याच्या चर्चेला जोरदार उधाण आले असले, तरी त्या पार्श्वभूमीवर फरार नराधम (Fugitive Murderous) मुख्याध्यापक शोधण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान मानले जात आहे.
गुन्हा दाखल; आरोपी मुख्याध्यापक फरार
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ही विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर (MP Nagesh Patil Ashtikar) यांची असून, नराधम मुख्याध्यापक दोनच वर्षापूर्वी हरडफ येथील शाळेत शिक्षक होता. संस्थेअंतर्गत बदलीतून थेट मुख्याध्यापक म्हणून तामसा येथे आला होता.
बेकायदेशीर गर्भपात करणारा तो डॉक्टर कोण ?
अल्पवयीन विद्यार्थिनीचा बेकायदेशीर गर्भपात (Abortion) करणारा तो नांदेडचा नामांकित डॉक्टर कोण? याचा शोध पोलिसांनी घेणे गरजेचे आहे.