काळे परिवार तर्फे भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन
गडचिरोली/कुरखेडा (Tanha Pola) : कुरखेडा येथील स्थानिक हनुमान मंदिराच्या प्रांगणात काळे परिवारातर्फे तान्हा पोळा निमित्त बाल गोपालांकरीता भव्य (Tanha Pola) तान्हा पोळ्याचे आयोजन आज दि.३ रोज मंगळवारी करण्यात आले आहे. यात वैयक्तिक रित्या स्वखर्चाने काळे परिवारातर्फे बक्षीस वाटप केली जातात. मागील ३८ वर्षा अगोदर स्व.गोपाळराव काळे यांनी तान्हा पोळा हनुमान मंदिराच्या प्रांगणात भरविण्याची परंपरा सुरु केली होती.दिवसागणिक दर वर्षी नवनवीन बक्षीसे वाटप केली जातात.
या कार्यक्रमात कुंभार समाज बांधव यांचे मोठ्या मोलाचे योगदान व सहकार्य लाभत असते. आज होणार्या (Tanha Pola) तान्हा पोळ्यात जास्तीत जास्त बालगोपालांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुरखेडा नगरपंचायत चे गटनेते तथा शिवसेना उ.बा.ठा. गटाचे तालुका प्रमुख,जय गडमाता नागरी सह. पतसंस्था मार्गदर्शक आशिष काळे यांनी केले आहे.