पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनात इसाद येथून सुरुवात
परभणी (Parbhani addiction free campaign) : जिल्ह्यात तंटामुक्ती, व्यसनमुक्ती अभियानाला सुरुवात झाली आहे. गंगाखेड तालुक्यातील इसाद येथे नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेसी, उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील, स्थागुशाचे पोनि. अशोक घोरबांड, पो.नि. दिपककुमार वाघमारे यांच्या उपस्थितीत अभियान सुरु करण्यात आले.
२५ वर्षापूर्वी शहाजी उमाप हे परभणी जिल्ह्यात पोलिस उपअधिक्षक म्हणुन कार्यरत होते. यावेळी त्यांनी सदर अभियान यशस्वीपणे राबविले होते. आता पोलिस उपमहानिरीक्षक झाल्यानंतर त्यांनी पुन्हा अभियान सुरु केले आहे. इसाद येथील तरुणांना एकत्र घेत पथक बनविण्यात आले आहेत. व्यसनमुक्त, तंटामुक्त गाव करण्यासाठी ग्रामस्थांची मदत घेतल्या जाणार आहे. इसाद येथून सुरु झालेल्या या अभियानाला तंटामुक्त अध्यक्ष विश्वनाथ भोसले, पोलिस पाटील अशोक भोसले, श्रीमती ज्योती सातपुते, रामप्रसाद सातपुते, प्रभाकर भोसले, रोहिदास सातपुते, नम्रता भोसले, वैशाली सातपुते, कुंता सातपुते, अर्चना भोसले आदींची उपस्थिती होती.
इसाद येथील १५ जण पोलिस दल तर २५ जण सैनिकी सेवा करत आहेत. इसाद गावातील नवतरुणांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी ग्रामस्थांशी संवाद साधतांना केले.