शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दरामध्ये ताडपत्री वाटप!
रिसोड (Tarpaulin Distribution) : दिवाळीच्या शुभ पर्वावर माजी आमदार अँड विजयराव जाधव (MLA Vijayrao Jadhav) यांच्या सहकार्याने रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दरामध्ये ताडपत्री वाटपाचा कार्यक्रम दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी छत्रपती फॅशन मध्ये राम जाधव यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित!
सोयाबीन काढण्याच्या हंगामामध्ये ताडपत्रीला मोठी मागणी आहे हे लक्षात घेऊन माजी आमदार अँड विजयराव जाधव यांच्या सहकार्याने दिगंबर जाधव यांनी शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दरामध्ये ताडपत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. चांगल्या प्रतीची ताडपत्री अल्प दरामध्ये शेतकऱ्यांसाठी (Farmers) उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमासाठी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राम विजयराव जाधव, भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायणराव सानप,जयंत वसमतकर, दीपक सोनुने, दिगंबर जाधव, प्रवीन हाडे, बबनराव सुरुशे, श्याम रासकर व मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.


