देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली (Buldhana):- ३१ वर्षीय तरूण शेतकऱ्याने सततची नापीकी व कर्जबाजारी (debt trading) पणामुळे स्वत.च्या शेतात जावून लिबांच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या (suicide) केली . ही घटना १६ मे रोजी १२.३० वाजेच्या सुमारास अंत्री खेडेकर येथे घडली.
पावसामुळे संपूर्ण पिकाचे अतोनात नुकसान
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंत्री खेडेकर येथील संजय उर्फ पप्पू नरहरी खेडेकर यांच्याकडे अंत्री खेडेकर शिवारात गट न. ९९२ मध्ये साडेतीन एकर जमीन आहे. त्यांनी या जमिनीवर जवळच असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) शाखेकडून १.२५ हजार रुपये पीक कर्ज घेतले होते. तसेच पत्नीच्या नावावर ग्रामीण कुटा बँक कडून कर्ज घेतले आहे. ते आई वडीला मधून विभक्त राहत असून त्यांना दोन मुली एक मुलगा आहे. ये या तीन एकर जमिनीवर आपल्या कुंटूबाचा उदरनिर्वाह चालवत होते. परंतु यावर्षीच्या अती पावसामुळे संपूर्ण पिकाचे अतोनात नुकसान झाले आणि बँक कडून घेतलेल्या कर्जाची परतफेड होवू शकत नाही.
शेतातील झाडाला नॉयलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या
आता कर्जाची परतफेड कशी करावी त्याच बरोबर पत्नीच्या नावावर असलेल्या ग्रामीण कुटा बँक चे लोन कसे फेडावे या नैराश्यपोटी संजय उर्फ पप्पू खेडेकर यांनी शेतात आंबा उतरण्याचा बहाना करून ते शेतात गेले आणि स्वत: च्या शेतातील एका लीबांच्या झाडाला नॉयलॉन दोरीच्या (nylon string) सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली . हा प्रकार शेजारी अमोल पवार यांनी पाहिला असता त्यांनी तगेच गावातील रामदास मोरे यांना फोन लावून माहिती दिली त्यामुळे मोरे यांनी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांना कळविले दिली . त्यांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहेकॉ कैलास उगले , काही पोलीस कर्मचारी यांनी येवून पंचासमक्ष पंचनामा (Panchnama) करुण मर्ग दाखल केला . मात्र घरातील कर्ता पुरुष आणि लहान वयातील दोन मुली व एक मुलगा यांच्या डोक्यावरील वडिलाचे छत्र हरविल्याने गावकरी हळहळ व्यक्त करीत आहेत .