अकोला (Truck Accident) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत असलेल्या नवीन किराणा मार्वेâट येथे शिवसेना वसाहत येथील रामदास श्रीराम रत्नाळे यांची चहाची कॅन्टिंग आहे. त्यांचा चहाचा व्यवसाय असल्याने नवीन किराणा मार्वेâट येथून बिझनेस सेंटर येथे चहा घेऊन जात असताना ट्रक निष्काळजीपणे भरधाव चालविल्याने रामदास रत्नाळे यांना ट्रकखाली अक्षरश: चिरडल्याची घटना मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी घडली. (Truck Accident) अपघाताच्या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून, जुने (Akola Police) शहर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
शहरातील जुने शहर पोलिस स्टेशन (Akola Police) हद्दीत नवीन किराणा मार्केट येथे शिवसेना वसाहत येथील रहिवासी रामदास श्रीराम रत्नाळे यांची छोटीशी चहाची कॅन्टिंग असून, त्यांचा चहाचा व्यवसाय आहे. नियमितपणे व्यवसाय करीत असताना बिझनेस सेंटर येथून चहाची मागणी ग्राहकांनी केल्यानंतर रामदास रत्नाळे चहा घेऊन जात असताना एमएच- ३० – बीडी- ७७५७ क्रमांकाच्या ट्रकचालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने श्रीराम रत्नाळे यांना चिरडले. त्यामुळे त्यांचा (Truck Accident) घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला.
सदर अपघाताच्या घटनेची (Truck Accident) माहिती जुने शहर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करून या अपघाताच्या घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर श्रीराम रत्नाळे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेप्रकरणी जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये रत्नाळे यांच्या नातेवाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर (Truck Accident) अपघाताचा पुढील तपास (Akola Police) जुने शहर पोलिस करीत आहेत.