परभणी/जिंतूर(Parbhani):- तालुक्यातील पांढरगळा जिल्हा परिषदेच्या शाळेवरी शिक्षकांची इतरत्र बदली झाल्यामुळे शिक्षण विभागाने(Department of Education) एकाही शिक्षकाची नियुक्ती केली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून संभाजी ब्रिगेड च्या वतीने दिनांक 13 ऑगष्ट रोजी गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तत्काळ शिक्षक देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
जिंतूर तालुक्यातील पांढरगळा येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून पहिली ते चौथी पर्यन्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शाळेवर दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र जुलै महिन्यात एका शिक्षकाचे निलंबन झाले आहे तर दुसऱ्या शिक्षकाने विनंती बदली करून घेतली आहे. त्यामुळे दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत परिणामी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नसल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. परिणामी शिक्षण हक्क कायद्याच्या कोणताही गोरगरीब मुलांना होत नसल्यामुळे पालकातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे म्हणून शिक्षण विभागाने तत्काळ दोन शिक्षकांची नियुक्ती करावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे, तालुका अध्यक्ष अँड माधव दाभाडे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद कवडे, शरद ठोंबरे, अजिंक्य भोसले, संतोष शिंदे यांच्यासह संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.