शिक्षक समन्वय संघा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश महामोर्चा
हिंगोली (Teacher Coordinating Union) : अंशत: अनुदनित, विना अनुदानित, माध्यमिक, उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने ६ ऑगस्टला (Teacher Coordinating Union) शिक्षक समन्वय संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश महामोर्चा काढला. ज्यामध्ये (Chief Minister) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री हाय.. हाय.. अशा घोषणा देऊन हा परीसर दणाणून सोडला होता.
राज्यात सध्या अंशता अनुदानित तथा विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय यातील शिक्षक बांधवाना प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ अनुदान हे १ जानेवारी २०२४ पासून देण्यात यावे. या मुख्य मागण्यासाह इतर मागण्यासाठी हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात २२ जुलै (Collector office) जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, मुंडण आंदोलन, अन्नत्याग आंदोलन, आमरण उपोषण, थाळी नाद आंदोलन, भीक मागो आंदोलन असे विविध प्रकारचे आंदोलन सुरु असून. राज्य सरकारने या शिक्षक वर्गाच्या मागण्या अजून ही मान्य केल्या नसल्याने. (Teacher Coordinating Union) शिक्षक वर्ग आता आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरला आहे.
सरकार मात्र चालढकल करीत आहे. याचाच निषेध म्हणून हिंगोली जिल्हात ६ ऑगस्ट मंगळवार रोजी शिक्षणाधिकारी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा आक्रोश महामोर्चा काढण्यात आला होता. हा आक्रोश महामोर्चा शिक्षणाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद मैदान येथून सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, पोस्ट ऑफिस रोड, जवाहर रोड, डॉ आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, अग्रेसन चौक, ते जिल्हाधिकारी कार्यालयायावर धडकला. यावेळी अनेकांची समयोचित भाषणे झाली. याप्रसंगी उपस्थित शिक्षकांनी (Chief Minister) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री हाय..हाय अशा घोषणा दिल्या होत्या.
या (Teacher Coordinating Union) प्रकरणी दिलेल्या निवेदनावर शिक्षक समन्वय संघाचे जिल्हाध्यक्ष आशिष इंगळे, उपाध्यक्ष सुनील डुकरे, संतोष माळवटकर, बालाजी जांबुतकर, संदीपान कदम, मनोज बावगे, रोहिदास आसोले, डावोजी बळवंते, किरण गंगासागरे, दिनेश भोपाळे, अविनाश दळवी, माणिक चव्हाण, गुंडय्या शिवसांब, प्रदीप दळवी, सचिन धायणे, सचिन रावण, एस.ए.मईंग, एम.व्ही.दवणे, एस.एस.जाधव, डी.एस.लांडे, के.एम.जाधव, बी.जी.सूर्यवंशी, ए.आर.चौधरी, आर.के.भालेराव, हिमांशू देशमुख, व्ही.पी.काळबांडे, एस.के.घुगरे, एम.बी.पट्टेबहादूर, पी.डी.शिंदे, प्रमोद चौधरी, एस.आर. इंगळे, एच.एन.देशमुख, एम.जे. चाटसे, जी.के.दिपके, एस.एम. पवार, ए.टी.घोंगडे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.