पाथरी (Teacher Coordination Union) : विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघाच्या (Teacher Coordination Union) सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या पाचव्या दिवशी शुक्रवार २६ जुलै रोजी उपोषण करणाऱ्या तिन्ही शिक्षकांची तब्येत खालावली. दरम्यान खासदार संजय जाधव यांनी (Hunger strike) उपोषणार्थीं शिक्षकांशी मोबाईल वरून चर्चा केली. शिक्षण मंत्र्यांनी घोषणा करूनही अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना विनाअट पुढील टप्प्या लागू न झाल्याने पाथरी तहसील कार्यालया समोर प्रा. दीपक कुलकर्णी, ज्ञानेश चव्हाण व प्रा. रविकांत जोजरे हे सोमवार २२ जुलै पासून अन्नत्याग अन्नत्याग आंदोलन करत आहेत. उपोषणाच्या शुक्रवारी पाचव्या दिवशी तिन्ही (Hunger strike) उपोषणार्थीं शिक्षकांची तब्येत खालावली.
शिक्षकांच्या रक्तातील साखर कमी झाल्याने त्यांना दवाखान्यात हलवण्याचे पत्र वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुमंत वाघ यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहे. दरम्यान सायंकाळी सात वाजेपर्यंत उपोषणस्थळी पोलीस (Police Administration) अथवा महसूल प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले नव्हते. दरम्यान पाचव्या दिवशी (Hunger strike) उपोषण स्थळी ओबीसी नेते प्रा . लक्ष्मण हाके , नवनाथ वाघमारे यांनी व शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे यांनी भेट घेत पाठींबा दिला .