शिक्षक दिन अन्याय दिन म्हणून साजरा
वाशिम/मानोरा (Teacher Day) : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध समस्या सोडविल्या जात नसल्याने व त्याबाबत वारंवार आश्वासन देवूनही आश्र्वासित मागण्यावर निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पूर्वी दिलेल्या इशारा पत्रानुसार यावर्षीच्या (Teacher Day) शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून शिक्षक दिन अन्याय दिवस म्हणून साजरा केला. व शिक्षक दिनी आंदोलन करून सरकारच्या निषेधार्थ राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना तहसिलदार मार्फत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षक दिनी दि. ५ सप्टेंबर रोजी निवेदन सादर केले.
तहसिलदार मार्फत शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन
निवेदनात नमूद केले आहे की, मागील वर्षी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्याबाबत चर्चा करून काही मागण्या मान्य करत आश्वासन दिल्यानंतर महासंघाने बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला होता. त्यानंतर मान्य मागण्यामधील १२९८ वाढीव पदाना मान्यता देण्याऐवजी सदर पदावर कार्यरत केवळ २८३ शिक्षकांच्या समावेशनाचा आदेश ९ नोव्हेंबर व ७ मार्च रोजी काढून राज्यात काही (Teacher Day) शिक्षकांचे समावेशन करण्यात आले. परंतु अनेक शिक्षकांचे समावेशन अजून झाले नाही. अनेक ब व क प्रपत्रावरील वरील शिक्षकांना त्यांच्या जिल्हयात व विभागात रिक्त जागा असूनही त्यांच्या समयोजनेचे अधिकार उपसंचालकांनी देण्याचे कबूल करुनही त्याबाबतचे आदेश निघालेले नाहीत. तसेच शिक्षकांनी दोन विषयात प्राप्त केलेल्या शैक्षणिक अर्हतेपैकी एका विषयाची जागा रिक्त असेल तर त्या जागेवर समायोजन करण्याचे मान्य करूनही त्याबाबत आदेश निर्गमित झालेले नसल्याने त्यांचे समायोजन अद्याप बाकी आहे. अर्धवेळ समायोजन शिक्षकांचा तिढा अद्याप कायम आहे. अनेक समायोजित शिक्षकांची वेतन अद्यापही सुरू झालेले नाही.
आय टी शिक्षकांच्या समयोजनाचा शासानादेश, अंशतः अनुदान प्राप्त शिक्षकांना वाढीव टप्पा, सेवांतर्गत आश्र्वासित प्रगती योजना, शाळा संहितेनुसार वर्गातील विद्यार्थी संख्येचे निकष पाळणे इत्यादी मान्य मागण्यांचे अध्यादेश निघाले नाहीत. उर्वरित मागण्याबाबत अधिवेशन संपताच चर्चा केली जाईल, असे सांगितले होते. परंतु अद्यापही चर्चा केलेली नाही. महासंघ तर्फे आपली अनेक वेळा भेटी घेऊन, निवेदन देवूनही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामूळे (Teacher Day) शिक्षक दिनी महासंघाने सुचविल्याप्रमाणे आंदोलन करण्यात आले आहे. असे शालेय शिक्षण मंत्री यांना कळविले आहे. या आंदोलनात विज्युक्टा संघटना मानोरा तालुकाध्यक्ष प्रा. संजय हांडे, प्रा. दिलीप वानखेडे, प्रा. विजय भगत, प्रा. सुनिल काळे, प्रा.विलास गांजरे, प्रा. अनिल वाघमारे, प्रा. डबले, प्रा.रोहिदास राठोड, प्रा. कु.भलामी, प्रा.जगदिश पाटील व इतर बहूसंख्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक सहभागी झाले होते.