सईद खान यांची मध्यस्थी
परभणी/पाथरी (Teacher Delegation) : अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना विनाअट पुढील टप्पा लागू न झाल्याने शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मागील महिन्यात तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते . 22 जुलै पासुन पाथरी येथे सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन 28 जुलै रोजी (Education Minister) शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दूरध्वनीवरून शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्या संदर्भात आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले होते. यावेळी शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी मध्यस्थी केली होती.
यावेळी शिक्षकांचे एक शिष्टमंडळ मुंबई येथे शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार असल्यास संदर्भात चर्चा झाली होती . त्यानुसार गुरुवार 8ऑगस्ट रोजी शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या मध्यस्थी मध्ये शिक्षकांचे शिष्ठमंडळ मुंबई येथे शिक्षणमंत्री (Deepak Kesarkar) दीपक केसरकर (Education Minister) यांना भेटले यावेळी त्यांनी शिक्षकांचे प्रश्न शिक्षणमंत्र्यांसमोर मांडले .
मुंबई येथे वर्षा निवास्थानी मराठवाडा शिक्षक समनव्य संघ यांच्या शिष्टमंडळा शिक्षणमंत्री (Deepak Kesarkar) दिपक केसरकर (Education Minister) यांची भेट घेऊन चर्चा करतांना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान,माजी शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे,परभणी महानगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष माजू लाला,दीपक कुलकर्णी ,शिक्षक शिष्टमंडळ सदस्य रविकांत जोजारे,गजानन खैरे ,योगेश पटणे,रामप्रसाद सीताफळे, यावेळी शिक्षण मंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी येत्या आठ दिवसांत शिक्षकांच्या टप्पा अनुदान चा शासन निर्णय काढण्यात येईल व जिल्हा परिषद शाळा व संस्था यांच्या अनुदानाच्या बाबतीत ही निर्णय घेऊ, असे आश्वासित केले आहे.