कोरपना (Chandrapur):- ग्रामीण भागातील प्रतिभावंत व गरजू विद्यार्थी यांनी प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी यांच्यातील सुप्त गुणांचा विकास व्हावा त्यांना पुढील आयुष्यसाठी प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या हातून वैयक्तिकतेसोबत समाजासाठी सर्वोत्तम कार्य घडावे आणि समाजाचा स्तर सुधारावा या उद्धांत हेतूने तिरळे कुणबी (पाटील) समाज संघटनाद्वारा पुरस्कृत (rewarded)संत बाजीराव महाराज बहुउद्देशीय संस्था मुकुटबन तर्फे समाजातील प्रतिभावंत विद्यार्थी व प्रतिष्ठित बांधवांचा गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला.
मुकुटबन येथे तिरळे कुणबी समाजाचा सत्कार सोहळा
यात कोरपना तालुक्यातून तिरळे कुणबी समाजात(Kunbi community) अत्यंत प्रतिकूल परस्थितीशी झगडत ज्यांनी जीवन घडविले, कठोर मेहनतीतून केलेली शैक्षणिक प्रगती, व त्यातून घडविलेले सुंदर कॅरियर, ज्यांनी या उज्वल यशाने स्वतःसोतच कुटुंबाचे व समाजाचे नाव पंचक्रोशीत मोठे केले याचा समाज बांधवांना अभिमान असून त्यांच्या या उतुंग भरारीसाठी उज्वल यशासाठी शिक्षक गौतम बाबाराव खडसे यांना तिरळे कुणबी समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात येत असल्याचे प्रमाणपत्र (certificate) तसेच सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले आहे यावेळी झरी जामणी तहसीलशाखेचे अध्यक्ष गणेश बुट्टे, उपाध्यक्ष रमेश शिरपूरे,सचिव प्रा. देविदास गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांसह समाज बांधवांची उपस्थिती होती या पुरस्कारणाने कोरपना तालुका तिरळे कुणबी (पाटील ) समाज बांधवातून शिक्षक गौतम खडसे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत असुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.




