शिक्षक संचालकांचे आदेश, बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा
यवतमाळ (Teacher recruitment scam) : जिल्ह्यातील शिक्षक भरती घोटाळ्याच्या संदर्भात दैनिक देशोन्नती वृत्त लेखन केले आहे. यवतमाळ या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या बातमीबाबत आपल्या स्तरावरुन सखोल चौकशी करुन त्याबाबतचा सविस्तर अहवाल संचालनालयास सादर करावा असे आदेश शिक्षण संचालकांच्या मान्यतेने शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक डॉ. वंदना वाहुळ यांनी एक पत्र काढून विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग यांना दिले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील (Teacher recruitment scam) शिक्षक भरती घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात जुन्या तारखांमध्ये नियुत्तäया दाखवून अनेक शिक्षकांच्या भरतीला मान्यता देण्यात आली असून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी खाजगी संस्थेवर नोकरीला लागले आहेत. नोकरीला लागताना या ठिकाणी मोठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे स्पष्ट आहे.परंतु यवतमाळ जिल्ह्यात दरम्यानच्या काळात बनावट कागदपत्रे, जुन्या तारखांमध्ये नियुत्तäया दाखवून अनेक (Teacher recruitment scam) शिक्षकांच्या भरतीला मान्यता देण्यात आली. यात कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली असून या प्रकरणांची तक्रार सुध्दा झाली आहे तर खासगी अपंग अनुदानित शाळेवर अनेक शिक्षक खोट्या कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील खाजगी अपंग अनुदानित आहेत काही अपंग शिक्षक खोट्या कागदपत्रांच्या आधारे अपंग शिक्षक म्हणून कार्यरत आहे मात्र खरे अपंग व्यक्तींना डावलून पैशाच्या जोरावर अनेक बोगस अपंग (Teacher recruitment scam) शिक्षण खोट्या सर्टिफिकेटच्या आधारावर शासनाची लुट करत आहे. खाजगी अनुदानित अपंग शाळेत मोठ्या आर्थिक उलाढाली तूनच खोट्या कागदपत्राच्या आधारे नोकरी करत आहे तर काही अल्पसंख्याक शाळाही संशयाच्या भोवर्यात: शिक्षण हे ‘राष्ट्रीय’ कर्तव्य असताना शिक्षणातून दिग्रस येथील एका मेहनती शिक्षक संस्था चालकाने ‘मेह’ नतिने विद्यार्थी घडविण्याच्या जागेवर एका ‘मेह’नती संस्था चालकांने सदर शाळेला सुरुवाती पासुनच बिंदुनामावली लागु असतानाही व संस्थेमध्ये सुध्दा बहुसंख्येत समाजाची लोक संचालक म्हणुन होते. परंतु संस्थेचे अध्यक्ष यांनी अल्प संख्यांक आयोगाला चुकीची माहिती पुरवुन सदर संस्थेला, विद्यालयाला अल्पसंख्याक प्रमाणपत्र मिळविलेले असल्याची खंमग चर्चा सुरू आहे.
सदर प्रमाणपत्राचा वापर करुन संस्थेने सदरची पदभरती प्रक्रिया राबवुन अवैधरित्या पदभरती करण्यावर संस्थाचालकांने खुप ‘मेह’ नत घेतल्याची चर्चा आहेत मध्ये सुरू आहे. तर मारेगाव येथील संकेत ज्युनियर सायन्स कॉलेज, मारेगाव, येथे तत्कालीन उपसंचालक, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, अमरावती निबंधक शिवलिंग पटवे यांच्या संगनमताने. संकेत ज्युनिअर कॉलेज येथील शिक्षकांना सुधारित पद्धतीने मान्यता देत वर्ष २०११ पासून मान्यता दिले आहे.
त्यासाठी त्या शिक्षकांचा शालार्थ आयडी बदलविण्यात आला असून तसेच खोट्या कागदपत्रांचा वापर करत तेथील ठरावी (Teacher recruitment scam) शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीचा फायदा चुकीच्या मार्गाने देण्यात आला असल्याची तक्रार शिरीष पावडे रा. मारेगाव यांनी शिक्षण आयुक्त, पुणे, यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांना दिलेल्या पत्रामुळे शिक्षक भरतीला बंदी असतानाही राज्यात २०१२ ते २०१६ या दरम्यानच्या काळात अनेक खाजगी संस्था मध्ये,शिक्षकांना मान्यता देण्यात आल्याची बाब उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.