महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे शिक्षण संचालक पुणे व निवडणूक विभागाला निवेदन
अमरावती (Teacher training) : नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रम (Induction Program) अंतर्गत प्रशिक्षणा व विधानसभा निवडणूक प्रशिक्षण दिवाळी सुट्टी लक्षात घेऊन प्रशिक्षण स्थगित करण्यात यावे असे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे,राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी शिक्षण संचालक राहुल रेखावार व मुख्य निवडणूक अधिकारी यांना दिले आहे.असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी सांगीतले आहे.
दि. ४ नोव्हेंबर २०२४ ते १० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत सलग सात दिवसाचे सेवापूर्व Offline प्रशिक्षण नवनियुक्त शिक्षकांसाठी आयोजित केले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी संपूर्ण राज्यात मतदान आहे. त्यासाठी राज्यातील सर्व शिक्षक मतदान अधिकारी म्हणून नियुक्त आहेत. यात नवनियुक्त शिक्षक सुद्धा आहेत. सर्वांच्या सेवा मा. भारत निवडणूक आयोगाने अधिग्रहित केल्या आहेत. मतदान अधिकारी म्हणून शिक्षकांचे निवडणूक विषयक प्रशिक्षण सेवांतर्गत प्रशिक्षण काळातच येणार आहे.तसेच नवनियुक्त शिक्षण सेवक निरनिराळ्या तालुक्यात सेवारत असून सर्वांचे निवडणूक प्रशिक्षण दोन टप्प्यात वेगवेगळ्या दिनांकाला विधानसभा मतदार संघ स्तरावर असणार आहे. त्यामुळे अशाप्रकारचे प्रशिक्षण घेणे अडचणीचे होणार आहे.
पवित्र पोर्टल ने नियुक्त शिक्षण सेवकांपैकी अनेक शिक्षण सेवक नियुक्ती झालेल्या जिल्ह्याबाहेरचे रहिवासी आहे. त्यांना आपल्या गावात दिवाळी दीर्घ सुट्टीतही जाऊ न देणे योग्य ठरणार नाही. आधीच निवडणूक प्रशिक्षणामुळे त्यांना अडचण झाली आहे. प्रशिक्षणासाठी नियुक्त सुलभकांचे सुद्धा निवडणूक विषयक प्रशिक्षण पाच दरम्यान असणार आहे.या सर्व वास्तव बाबीचा विचार करून शिक्षक प्रशिक्षण निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम झाल्यानंतर दि. २५ नोव्हेंबर २०२४ नंतर आयोजित करावे अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे,राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, शिक्षक नेते उदय शिंदे, राज्य सल्लागार विजयकुमार पंडित ,महादेव पाटील माळवदक,राज्य उपाध्यक्ष
राजन सावंत ,आनंदा कांदळकर,विलास कंटेकुरे, राज्य कार्याध्यक्ष,सयाजी पाटील,राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर,राज्य संघटक राजेंद्र खेडकर, सुरेश पाटील,राज्य कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील,सतिश सांगळे,राज्य संपर्क प्रमुख किशन बिरादार,राज्य प्रवक्ता नितीन नवले,राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर, राज्य ऑडिटर पंडित नागरगोजे,महिला आघाडी प्रमुख वर्षाताई केनवडे, नपा-मनपा आघाडी प्रमुख सुधाकर सावंत,जुनी पेन्शन आघाडी प्रमुख प्रफुल्ल पुंडकर,उर्दू आघाडी प्रमुख सैय्यद शफीक अली यांनी केले आहे असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.