उपोषणकर्त्या उमेदवारांची न्याय्य मागणी!
अमरावती (Teachers Bank Scam) : अमरावती जिल्हा परिषद (Zilla Parishad) शिक्षक सहकारी बँकेमध्ये मे महिन्यात 43 कर्मचारी अधिकाऱ्यांची (Teachers Bank Scam) मोठी नोकर भरती करण्यात आली. त्याकरिता ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीचा घाट घालण्यात आला, वृत्तपत्रातील जाहिरातीमध्ये बँकेचे नाव जाणीवपूर्वक लपवण्यात आले होते, केवळ अमरावती मधील अग्रगण्य बँक असा उल्लेख असल्यामुळे आम्ही ऑनलाईन फॉर्म भरून परीक्षा दिली होती. परंतु दिनांक 2 मे 2024 रोजी प्रत्यक्ष मुलाखती पर्यंत अनेक उमेदवारांनी अध्यक्ष आणि संचालक मंडळा सोबत कटकारस्थान आणि मोठा आर्थिक गैरव्यवहार करून स्वतःची निवड निश्चित करून घेतली होती.
याबाबत दिनांक 2 मे 2024 रोजी मा. जिल्हाधिकारी अमरावती, मा. पोलीस आयुक्त अमरावती, यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करून संभाव्य निवड होणाऱ्या उमेदवारांची यादी दाखल केली होती. त्यानंतर 13 मे 2014 रोजी सविस्तर तक्रार दाखल केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर (Teachers Bank Scam) बँक विभागीय सहनिबंधक यांच्या अधिनस्त येत असल्यामुळे त्यांना तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. विभागीय सहनिबंधकांनी अतिशय गंभीर आणि सखोल अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मा पोलीस आयुक्त यांना एक महिन्यापूर्वीच सादर केला आहे. दरम्यान किमान तीनदा आम्ही मा. पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या गंभीर प्रकरणात संबंधित जबाबदार यंत्रणांवर गुन्हे दाखल करून सविस्तर चौकशीची मागणी केली. पोलीस आयुक्तांनी सदर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला, दोन महिन्यांपासून अतिशय थंड पद्धतीने तपास सुरू ठेवला आहे.
या दरम्यान (Teachers Bank Scam) बँकेने सर्व निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष कामावर हजर करून त्यांचे वेतनही सुरू केले आहे. रीतसर तक्रार केली प्रत्यक्ष भेटी घेतल्यात, 100% पुरावे दिलेत, चौकशी अहवाल सुद्धा पोलीस खात्यापर्यंत पोहोचला आहे, तरीही तब्बल दोन महिने होऊनही या संदर्भात संबंधित जबाबदार यंत्रणांवर गुन्हे दाखल होत नाहीत अजूनही फसवणूक करणारे बँकेचे पदाधिकारी मोकाट फिरत आहेत ही लोकशाहीची आणि रात्रंदिवस अभ्यास करून नोकरीची अपेक्षा ठेवणाऱ्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा आहे. उपोषण कर्त्या उमेदवारांमध्ये सविता बोरवार ही दिव्यांग प्रवर्गात मोडणारी महिला उमेदवार आहे. परंतु दिव्यांगांचे आरक्षण शासनाचे आदेश असूनही बँकेने न ठेवल्यामुळे तिच्यावर सुद्धा घोर अन्याय करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ संबंधित जबाबदार व्यक्ती, यंत्रणांवर गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करावी आणि आम्हा विद्यार्थ्यांवर झालेला अन्याया विरोधात न्याय मिळवून द्यावा याकरिता बेमुदत उपोषण सुरू केले आहे.