रोटरी क्लब अमरावती अंबिका तर्फे झाला शिक्षकांचा सत्कार
अमरावती (Teacher’s Day) : रोटरी क्लब अमरावती (Rotary Club Amravati) अंबिका हे विविध सामाजिक उपक्रम राबवीत असते ह्यात शिक्षक दिनाचे (Teacher’s Day) औचित्य साधुन आज शिक्षकांचा व प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. ह्यात विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावती चे कोषाध्यक्ष (Prof. Dr. Hemant Deshmukh) प्रा. डॉ. हेमंत देशमुख, प्रा. रागीणी देशमुख, निलम रस्तोगी, निलेश निंदाणे, भारती गणवीर, दिव्या झाम्बानी, पुर्णिमा सुरणजेसे यांचा सत्कार रोटरी क्लब अमरावती अंबिकाचे अध्यक्ष राम चोटलानी, सुरेश मेठी, ऐ.जी डॉ. संगीता कडु, अमोल चवणे, अखिलेश खेतान, मुस्कान जयसिंगानी, दिनेश सरावगी, गौरव वानखडे, डॉ. लोभस घडेकर, हार्दिक कक्कड, अमित तिडके, मुख्य मार्गदर्शक समिर केडीया, अतुल कोल्हे, डॉ. मोनाली ढोले, दिलीप कैसकीया, नरेंद्र खंडेलवाल, रोहीत अग्रवाल, ममता खंडेलवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या वेळी शिक्षकांचे कार्य हे देश निर्मिती असल्याचे व एक (Teacher’s Day) शिक्षक पुढील पिढी घडवतो असे मत प्रा. डॉ. हेमंत देशमुख (Prof. Dr. Hemant Deshmukh) यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. कार्यक्रमांची सुरवात रोटरी प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी (Rotary Club Amravati) रोटरी सदस्य जे शिक्षक किंवा प्राध्यापक आहे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. ज्यात दिलीप केंसकीय,प्रा प्रवीण बोडखे,. कीर्ती बोडखे,. डॉ संग्राम देशमुख, डॉ अपरिजिता देशमुख, डॉ लोभस घडेकर ,डॉ समीर केडिया , डॉ मनोज चिठोरे, डॉ विजय गुल्हाने, डॉ परिमल , डॉ पंकज मोरे , डॉ पूजा कोल्हे यांचा सत्कार त्यांच्या शैक्षणिक योगदाणासाठी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख म्हणून डॉ मनोज चिठोरे यांनी काम केले. कार्यक्रमाला मोठया प्रमाणात रोटरी सदस्य उपस्थित होते