कळमनुरी बीट व केंद्र कन्या शेवाळा शिक्षण परिषदेस जिल्हाधिकार्यांची भेट
आखाडा बाळापूर (Abhinav Goyal) : ३१ डिसेंबर रोजी केंद्रीय प्राथमिक शाळा ढोलक्याची वाडी केंद्र मसोड केंद्र कन्या कळमनुरी केंद्र खरवड केंद्र कन्या शेवाळा या ५ केंद्राची शिक्षण परिषद कळमनुरी पंचायत समिती नवीन इमारत सभागृह या ठिकाणी संपन्न झाले.
या शिक्षण परिषदेस जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Abhinav Goyal) यांनी भेट दिली. यावेळी शिक्षणाधिकारी श्री प्रशांत डीग्रसकर व शिक्षण अधिकारी संदीपकुमार सोनटक्के व कळमनुरी पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रदीपजी बोंढारे , डायटच्या ज्येष्ठ अधिव्याख्याता श्रीमती जयश्री आठवले, अधिव्याख्याता श्री जाधव, गटशिक्षणाधिकारी दत्ता नांदे,केंद्र प्रमुख बालाजी गोरे , अंबादास डहाळे, अशोक देशमुख, सटवा रणवीर, विनायक भोसले उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Abhinav Goyal) यांनी तालुक्यातील शिक्षकांना आव्हान केले की आपल्या तालुक्यातील गुणवत्ता अंतिम स्तरापर्यंत पोहोचली पाहिजे व जे अंतिम स्तरावर विद्यार्थी आहेत त्यांना उच्चतम पातळी येण्यासाठी आपण प्रयत्न करावेत,विद्यार्थी बरोबर पालकांशी सुसंवाद साधुन विविध शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबवून गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी पुढाकार घेण्याच आवाहन त्यांनी केले.
यासाठी शिक्षकाप्रती असलेला विश्वास त्यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केला व तालुक्यातील सर्व शिक्षकांना आवाहन केले की ३१ जानेवारी २०२५ रोजी सर्व तालुक्यातील विद्यार्थी अंतिम स्तरांपर्यंत पोहोचविण्याचे काम आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच प्रशांत दिग्रसकर यांनी सुद्धा केंद्र शिक्षण परिषदेस मार्गदर्शन केले तसेच शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले तसेच कळमनुरी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी दत्ता नांदे यांनी सुद्धा अनमोल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख बालाजी गोरे यांनी केले.
यावेळी शिक्षण परिषदेस खरवड केंद्रातील पूर्ण शिक्षकांनी सुलभकाचे काम केले यामध्ये केंद्रप्रमुख श्री अंबादास यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती गायकवाड , राठोड , पवार, हनवते , रमेश सोनुणे , नागपुरे , मंगलगे , आडे , पाटील, गलांडे , दासूद , गायकवाड, बिराजदार, चव्हाण, काशीदे यांनी आपल्या शाळेतील सर्व शैक्षणिक साहित्यसह विद्यार्थ्यांना प्रगत कसे करावे व विद्यार्थ्यांना उच्चतम पातळीपर्यंत कसे नेण्यासाठी कसे प्रयत्न करावेत यासाठी आपल्या हस्त कलेतून शैक्षणिक साहित्याद्वारे भाषा विषय गणित विषय व विज्ञान विषय कशा पद्धतीने विद्यार्थ्याला शिकवावा याचे संपूर्ण मार्गदर्शन केले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी पाचही केंद्रातील सर्व शिक्षक यांनी खूप परिश्रम घेतले व पाच केंद्रातील जवळपास २०० शिक्षक या कार्यशिक्षण परिषदेस उपस्थित होते आस गटशिक्षणाधिकारी दत्ता नांदे यांनी सांगितले.