मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाणार
हिंगोली (Teachers Morcha) : विद्यार्थी व शिक्षक यांच्यावरील संच मान्यता बाबतचा १५ मार्च २४ व ५ सप्टेंबर २०२४ चा कंत्राटी शिक्षण भरतीचा शासन निर्णय रद्द होण्यासाठी व इतर प्रलंबित मागण्याच्या मागण्यासाठी राज्य मध्यवर्ती समन्वय संघटनेच्या वतीने २५ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर (Teachers Morcha) मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता.या बाबत शासना नोटीस दिली होती; परंतु शासनाकडून या मागणीसाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे सर्व जिल्हाधिकारी कार्याव मोर्चा काढण्यात आला हिंगोली जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आल्यावर मोर्चा (Teachers Morcha) काढण्यात आला आहे.
या (Teachers Morcha) मोर्चात जिल्ह्यातील म.रा.प्राथमिक शिक्षक संघ, म.रा. प्राथमिक शिक्षक समिती प्रहार शिक्षक संघटना , म.रा.शिक्षक परिषद अखिल म.रा.प्राथमिक शिक्षक संघ,जुनी पेन्शन संघटना , महाराष्ट्र शिक्षक कॉग्रेस प्रतिनिधी म.रा.कास्ट्राईब शिक्षक संघटना, म.रा. शिक्षक सेना,राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ, अखिल महाराष्ट्र महिला शिक्षक संघ,सर्व शिक्षक संघटनांचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी व शिक्षक सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .या मोर्चाला खाजगी विनाअनुदानित कृती समिती, खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना , काँग्रेस शिक्षक सेल यासह आदी शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला होता. या मोर्चात जिल्ह्यातील जवळपास २५०० ते ३०००हजार शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हा (Teachers Morcha) मोर्चा जिल्हा परिषद बहुविध प्रशालेच्या मैदानावरून छत्रपती शिवाजी महाराज चौक , इंदिरा गांधी चौक नांदेड नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्या नंतर या ठिकाणी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष यांनी शासनाच्या विविध शासन निर्णय व शिक्षकांच्या मागण्यांबाबत आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने तयार केलेले निवेदन देण्यात आले. आपल्या भावना शासनापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी गोयल यांनी शिक्षकांच्या शिष्टमंडळाला दिले.
या (Teachers Morcha) मोर्चात महिला शिक्षक संघटना व महिला शिक्षकांनी सक्रीय सहभाग घेऊन मोर्चामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या , अशैक्षणिक कामे बंद करा ऑनलाईन कामामधुन शिक्षकांची मुक्तता करा अशा घोषणा देत परिसर दणानुन सोडून मागण्याकडे लक्ष वेधले. निवेदनात प्रमुख मागण्यामध्ये १५मार्च व ५ सप्टेंबर २०२४चा शासन निर्णय रद्द करा,जुनी पेन्शन योजना लागू करावी, २४वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना सरसगट निवडश्रेणी मंजुर करावी.७व्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या व २००४ च्या नंतर सेवेत रूजू झालेल्या शिक्षकांच्या वेतन त्रुटींचा विषय मार्गी लावावा, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश विनाविलंब मिळावेत व २०२४-२०२५वर्षात राबविलेली गणवेश योजना रद्द करून जुन्याच पद्धतीने शाळा व्यवस्थापन समिती ला गणवेश खरेदी करण्यांची योजना कार्यान्वित करावी . राज्यातील शिक्षकांना १०-२०-३० सेवांतर्गत आश्वासित योजना लागू करावी.राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन जादा वेतनवाढी पुर्ववत सुरू कराव्यात , शिक्षकाकडील अशैक्षणिक कामे शालेय पोषण आहार, बीएलओ,काढून घ्यावेत , ऑनलाईन कामे कमी करून केवळ शिकविण्यासाठी वेळ द्यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
हिंगोली जिल्ह्यात ३७१६ शिक्षकांपैकी २६५४ शिक्षक सामुहिक रजेवर गेले. त्यामुळे ८७९ शाळांच्या अध्यापनावर शिक्षकांच्या (Teachers Morcha) मोर्चामुळे चांगलाच परिणाम जाणवला.