परभणी (Teachers Recruitment) : जिल्हा परिषद (Zilla Parishad) अंतर्गत शाळांतील नवनियुक्त शिक्षकांना तात्काळ पदस्थापना द्यावी. यासाठी पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठाण मांडले आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी या नवनियुक्त शिक्षकांना भेट नाकारली.
परभणी जिल्हा परिषदेने शिक्षक भरतीच्या (Teachers Recruitment) पवित्र पोर्टलवर एकूण १४८ पदांसाठी मागणी नोंदवली होती त्यानूसार पहिल्या टप्यातील १०० उमेदवारांची पवित्र प्रणालीवर निवड सुची जाहिर झाली. त्यांचे ४ व ५ मार्च रोजी कागदपत्रे पडताळणी अंती ९९ नवनियुक्त शिक्षक नियुक्तीस पात्र ठरले असतांना आणि येत्या शनिवारी शैक्षणिक सत्रास सुरूवात होऊन शाळा सुरू होत असतांनाही नवनियुक्त शिक्षकांना अजूनही पदस्थापना देण्यात आली नाही. त्यामुळे नवनियुक्त शिक्षक (Zilla Parishad) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या दालनात ठाण मांडून बसले आहेत.
पवित्र प्रणालीवर २५ फेब्रुवारी रोजी निवड यादी जाहिर झाल्याबद्दल (Zilla Parishad) जिल्हा परिषदेद्वारा कागदपत्र पडताळणी करण्यात आली. मात्र त्यानंतर तात्काळ पदस्थापना देणे आवश्यक असतांनाही कागदपत्रे पडताळणीनंतर तीन महिने उलटले तरीही अजूनही पदस्थापना देण्यात आली नाही. दरम्यानच्या काळात सार्वत्रिक निवडणूकांची आचारसंहिता लागल्यामुळे प्रक्रिया थांबली होती. मात्र आता आचारसंहिता शिथील होऊनही आठवडाभरापेक्षा अधिकचा कालावधी उलटला आहे आणि येत्या शैक्षणिक वर्षास शनिवारपासून सुरूवात होऊन शाळा सुरू होत आहेत. मात्र अजुनही पदस्थापना न दिल्यामुळे शाळा उघडण्याच्या पहिल्या दिवशी रूजू होण्याची नवनियुक्त शिक्षकांची अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत म्हणजेच शनिवार १५ जून पर्यंत नियुक्तीपत्र देण्याची (Appointed Teacher) नवनियुक्त शिक्षकांनी (Zilla Parishad) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.