देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज; तुम्ही तयार आहात ना?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज; तुम्ही तयार आहात ना?
Breaking Newsअमरावतीराजकारण

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज; तुम्ही तयार आहात ना?

Deshonnati Digital
Last updated: 2024/04/25 at 6:46 PM
By Deshonnati Digital Published April 25, 2024
Share

शुक्रवारच्या मतदानासाठी पथके मतदान साहित्यांसह रवाना
पोलींग पार्टींना मतदान साहित्याचे वितरण
१८ लाख ३६ हजार ०७८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
जिल्ह्यात १ हजार ९८३ मतदान केंद्र ; मेळघाटात सर्वाधिक ३५४ मतदान केंद्र

अमरावती (Amravati) : लोकसभा सार्वत्रिक (LokSabha Election) निवडणूक 2024 अंतर्गत 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. (Amravati LokSabha) अमरावती मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 078 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 1 हजार 983 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्ह्यातील या मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन (EVM machine) व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्रीचे वितरण मतदान चमूंना आज करण्यात असून मतदान पथके मतदानस्थळी रवाना झाली आहेत.

जिल्ह्यात सहा (Assembly Constituency) विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून तेथील मतदान केंद्राकरिता (EVM machine) ईव्हीएम मशीन व साधनसामग्रींचे बडनेरा मतदारसंघाकरिता श्री. शिवाजी बीपीएड कॉलेज या ठिकाणाहून वितरण झाले. अमरावती मतदारसंघाकरिता ईव्हीएम गोडावून न.1 (लोकशाही भवन) विद्यापीठ रोड येथून वितरण झाले. तिवसा मतदारसंघाकरिता एपीएमसी परिसर, सातरगाव रोड तिवसा, दर्यापूर मतदारसंघाकरिता (Assembly Constituency) एपीएमसी परिसर,दर्यापूर, मेळघाट मतदारसंघाकरिता फातिमा कान्वेंट हायस्कुल हॉल तर अचलपूर मतदारसंघाकरिता कल्याण मंडपम्, कोर्ट रोड या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य, साधनसामग्रींचे निवडणूक विभागाकडून संबंधित पोलींग पार्टींना वितरण करण्यात आले.

जिल्ह्यात सर्वाधिक 354 मतदान केंद्र मेळघाटात असून सर्वात कमी 309 मतदान केंद्र अचलपूर मतदारसंघातील आहे. बडनेरा मतदारसघांत 337 मतदानकेंद्र, अमरावती मतदारसंघात 322, तिवसा मतदारसंघात 319, दर्यापूर मतदारसंघात 342 याप्रमाणे एकूण 1 हजार 983 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट व अचलपूर या सहाही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र (पिंक बुथ), एक दिव्यांग मतदान केंद्र, युवा अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्र स्थापित करण्यात आली आहेत. तसेच (Assembly Constituency) बडनेरा मतदारसंघातील मतदान केंद्र 257 – मनपा उर्दु प्राथमिक मुलांची शाळा क्र. 10 खोली क्र. 4 जुनी वस्ती बडनेरा हे इंद्रधनुष्य (Rainbow) या थीमवर असणार आहे. आणि धामणगाव रेल्वे येथील जि.प.प्रायमरी मराठी शाळा खोली क्र. 1 उसळगव्हाण हे मतदान केंद्र आदिवासी मतदान केंद्र या थीमवर असणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यातील सहाही (Assembly Constituency) विधानसभा मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष दिले जात आहेत. जिल्ह्यातील 993 मतदान केंद्रावर वेब कास्टींगव्दारे निगरानी ठेवली जाणार आहे. सर्व मतदार केंद्रावर सावली मंडप, प्रतिक्षा कक्ष, एनएसएस/एनसीसी स्वयंसेवकांची मदत, मतदार मदत कक्ष, मेडीकल किटसह वैद्यकीय पथक आदी सुविधा मतदारांना पुरविण्यात येणार आहे. दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हिल चेअरसह इतर आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

मतदान केंद्रातील आवश्यक सुविधा व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय, नि:ष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी (LokSabha Election) लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी कटियार यांनी केले आहे.

You Might Also Like

Child Murder: मृतदेहावर पडले होते किडे…खून करताना आईचे हृदय वितळले नाही!

Endometriosis Problem: केवळ मासिक पाळीच्या दुखण्याहून अधिक गंभीर समस्या

Rajkumar Sundarani murder case: रजिस्टरवर खोलीची नोंद नव्हती, आरोपींकडून ओळखपत्रही घेतले नाही

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाचा लाभ त्यांना मिळणार नाही का?

One District One Product Award: ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ पुरस्कार: महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक

TAGGED: amravati, Amravati District, Amravati elections, Amravati LokSabha, Amravati Municipal, LokSabha Election, अमरावती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Ladki Bahin Yojana
विदर्भवर्धा

CM Ladki Bahin Yojana: बँक खाते आधार संलग्न करण्याच्या विशेष शिबिरात नियोजनाचा बट्ट्याबोळ

Deshonnati Digital Deshonnati Digital August 23, 2024
Paldongri: पंचायत समितीमधील सरपंचांच्या आमसभेत गोंधळ!
Lok Sabha Election Results 2024: नितीन गडकरींचा नागपुर मतदारसंघातून रंजक विजय…बघा VIDEO
Shiv Jayanti: शिवजयंती सोहळा…अदभूत तेवढाच अविस्मरणीय!
Anganwadi: अंगणवाडीतील बालके पोषण आहारापासून वंचित
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Child Murder
Breaking Newsक्राईम जगतदेश

Child Murder: मृतदेहावर पडले होते किडे…खून करताना आईचे हृदय वितळले नाही!

July 16, 2025
Endometriosis ProblemEndometriosis Problem
Breaking Newsआरोग्यदिल्लीदेश

Endometriosis Problem: केवळ मासिक पाळीच्या दुखण्याहून अधिक गंभीर समस्या

July 16, 2025
Rajkumar Sundarani murder case
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Rajkumar Sundarani murder case: रजिस्टरवर खोलीची नोंद नव्हती, आरोपींकडून ओळखपत्रही घेतले नाही

July 16, 2025
8th Pay Commission
Breaking Newsअर्थकारणदिल्लीदेश

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाचा लाभ त्यांना मिळणार नाही का?

July 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?