औंढा नागनाथ (Maha Shivratra Yatra) : तहसीलमध्ये गुरुवार 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महाशिवरात्र यात्रेनिमित्ताने आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीस तहसीलदार हरीश गाडे, पोलीस निरीक्षक जीएस राहिरे, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण हजर होते.
नागनाथ मंदिरात (Naganath Temple) महाशिवरात्र यात्रा (Maha Shivratra Yatra) 24 फेब्रुवारी ते एक मार्च दरम्यान आहे .26 फेब्रुवारी बुधवार रोजी महाशिवरात्र असून रात्री 12:30 वाजता शासकीय पूजा झाल्यानंतर दोन वाजता भाविकांच्या दर्शनासाठी नागनाथ मंदिर उघडण्यात येणार आहे. तसेच रात्री सात वाजता श्री चा पालखी उत्सव पार पाडणार आहे. एक मार्च शनिवार रोजी रथोत्सव असून रथउत्सवानिमित्ताने नागनाथ देवस्थानकडून नागनाथ मंदिरात दुपारी दोन वाजता भाविकांना महाप्रसाद वाटप होणार आहे .तसेच रात्री दहा वाजता रथोत्सवाला सुरुवात होणार आहे.
आरोग्य विभागाने (Maha Shivratra Yatra) यात्रा उत्सव काळामध्ये 24 तास (Naganath Temple) नागनाथमंदिरात उपस्थित राहावे. भाविकांना काही झाल्यास तपासणी करून औषधोपचार करावा. तसेच एक अंबुलन्स आणून मंदिराच्या परिसरात ठेवावी तसेच नगरपंचायतच्यावतीने अग्निशामन व मंदिर परिसरात स्वच्छता ठेवावी. महावितरण कंपनीने यात्रा उत्सव काळामध्ये लाईन व्यवस्था सुरळीत ठेवावी.
एसटी महामंडळांनी यात्रा उत्सव काळामध्ये ज्यादा बस गाड्या सोडून भाविकांना ने आण करण्याकरिता व्यवस्थितरीत्या नियोजन करावे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील सर्व खड्डे बुजून रस्ते खड्डे मुक्त करावेत.तसेच पोलीस प्रशासनाने यात्रा उत्सव काळामध्ये (Naganath Temple) नागनाथ मंदिर व परिसरात कडक बंदोबस्त ठेवावा. या बैठकीला संस्थांचे अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ,प्रसाद जोशी सर्जेराव पंडित विवेक जिरवणकर विष्णू रणखांबे या बैठकीला हजर होते.




