रिसोड (Risod) :- सदोष वस्तू व सेवेतील तुटीपासून ग्राहकांच्या हिताचे संवर्धन करण्याच्या हेतूने त्यांची फसवणूक होवू नये तसेच ग्राहकांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी १९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आला असून ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य या कायद्या अंतर्गत करण्यात येत असले तरी ग्राहकांनी जागरुक राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन रिसोड नायब तहसीलदार तथा प्रभारी तहसीलदार जवादे यांनी केले. रिसोड महसूल विभागाच्या (Revenue Division) वतीने तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य या कायद्या अंतर्गत करण्यात येत असले तरी ग्राहकांनी जागरुक राहणे आवश्यक
याप्रसंगी जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष वाघमारे , तालुकाध्यक्ष अ.भा. ग्राहक संरक्षण कमलकिशोर बगडिया , तालुका पुरवठा अधिकारी गणेश तांगडे,सेवानिवृत्त नायब तहसीलदर बाळासाहेब देशमुख रिसोड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश मांदळे यांची प्रमुख उपस्थित होती. याप्रसंगी जिल्हा ग्राहक संघटनेचे सदस्य पत्रकार संतोष वाघमारे , सेवानिवृत्त कृषी अधिकारी संजय उखळकर यांनी ग्राहक संरक्षण कायद्यानुसार सुरक्षेचा हक्क, माहितीचा हक्क, निवड करण्याचा अधिकार, म्हणणे मांडण्याचा हक्क, तक्रार करण्याचा आणि निवारण करून घेण्याचा हक्क, ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार असे प्रत्येक भारतीय ग्राहकाला हे सहा हक्क मिळाले आहेत. ग्राहकांना देण्यात आलेल्या अधिकारांचे आणि हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून ग्राहक संरक्षण कायदा काम करीत असल्याचे उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमानंतर आंबेडकर चौक मध्ये जनजागृतीच्या अनुषंगाने या प्रसंगी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने लोक कलावंत पथनाट्य गोहगाव हाडे येथील पथकाने सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका पुरवठा अधिकारी गणेश तांगडे यांनी केले.
सुत्रसंचालन सादिक शेख यांनी तर योगेश खंदारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी विविध बँकेचे अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील रास्त भाव दुकानदार व नागरिक उपस्थित होते.