गोंडपिपरी(Gadchiroli):- महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील चेकदरूर गावातून तेलंगणा राज्यात काही व्यक्तीद्वारे पायदळ जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मुखाबिरामार्फत गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांना मिळाली. त्या आधारावर पो.स्टे. (Police station)कर्मचार्यांसमवेत ठाणेदारांनी सदर ठिकाण गाठले असता तेलंगणा राज्यात विक्रीस नेत असलेले १२ गोवंश अवैधरित्या वाहतूक (illegal transportation)करताना परिसरात मिळून आले.
दोनही आरोपी घटनास्थळावरून पसार
या घटनेत १२ बैल(Bull) सापडले असता प्रत्येक जनावरांची साधारणतः किंमत १० हजार रुपये याप्रमाणे एकूण २ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर प्रकरणात दोन आरोपी सहभागी राहिले असून त्यांना पोलिसांची धाड पडणार असल्याचे माहीत होताच दोनही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. चौकशीअंती प्राप्त झालेल्या माहितीनुसार पंच प्रकाश रामचंद्र एकोनकर रा.चेकदरुर, मुकेश रामचंद्र तुमडे रा.महादेव वार्ड, गोंडपिपरी यांचे समक्ष संबंधित आरोपीविरुद्ध अप. क्रमांक १८८/२०२४ कलम ९, ११ महाराष्ट्र प्राणीसंरक्षण अधिनियम-१०७६, उप-कलम ११(१) प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंध कायदा-१९६० अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मोक्क्यावरून घटनेतील दोनही आरोपी फरार झाले असून त्यांचा पोलिसामार्फत शोध घेणे सुरू आहे. दरम्यान घटनेचा तपास ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी हाती घेतला आहे.