खापरखेडा (Khaparkheda Police) : नागरिकांना मदत मिळण्यासह तसेच इतर कामकाजासाठी (Khaparkheda Police) पोलिस ठाण्यात टेलिफोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे कामकाजातही सुलभता येते. मात्र खापरखेडा येथील पोलीस स्टेशनचा दूरध्वनी अनेक महिन्यापासून बंद आहे. यावरून हे टेलिफोन पोलिस ठाण्यातून हद्दपार होतात की काय, असे चित्र आहे. तरी तो तत्काळ चालू करून नागरिकांची सोय करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.
खापरखेडा पोलीस स्टेशनचा टेलिफोन बंद
पोलीस स्टेशन खापरखेडा (Khaparkheda Police) अंतर्गत खापरखेडा शहरासह २८ ते ३० गावे येत असून येथे विविध कारणावरून सतत तक्रारी होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा अशा वेळी सुज्ञ नागरिक प्रथम (Police Station) पोलीस स्टेशनशी संपर्क साधून पोलिसांना बोलावून वाद थांबण्याचा प्रयत्न करत असतात. पोलिस ठाण्यातील टेलिफोनवर फोन केल्यानंतर मदतीसह इतरही आवश्यक माहिती मिळते. त्यामुळे टेलिफोन उपयोगी पडतो. त्यामुळे ठाण्यात टेलिफोन गरजेचा आहे. तरी देखील (Khaparkheda Police) पोलीस स्टेशनने अद्याप फोन का चालू करून घेतला नाही, असा सवाल निर्माण होत असून, तत्काळ तो दुरूस्त करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तसेच तातडीच्या मदतीसाठी पोलीस विभागाने ११२ हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे.
क्रमांक झळकले मात्र फोन बंद
पोलिस ठाण्यातील (Khaparkheda Police) फलक, संकेतस्थळ यासह इतर ठिकाणीही संपर्कासाठीचे टेलिफोन क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. मात्र, प्रत्यक्षात संपर्क साधला असता फोन बंद असतो. यामुळे नागरिकांची गैरसोय होते. ज्यामुळे दुसरा क्रमांक मिळविण्यासाठी धडपड करावी लागते. सध्या स्थितीत पोलिस डायल 112 (Dial 112) हा जनतेसाठी एकमेव आधार ठरत आहे.