वर्धा(Wardha):- चीनमधून कोठलाही व्हायरस आला नसताना चीनमधून नवीन एचएमपीव्ही व्हायरस (HMPV Virus) आल्याची बतावणी करीत नागरिकांच्या अंगात एक नवीन लस टोचण्याचे षडयंत्र रचले जात आहे. एचएमपीव्ही व्हायरस म्हणजे ह्यूमन मेटानोमा व्हायरस. यावर सगळे व्हायरस चीनमधूनच का येतात, त्याला भारतात यायला चीनमधूनच (China) राजमार्ग कसा उपलब्ध होतो, अशा शंका नागरिकच विचारू लागले आहेत.
सगळे व्हायरस चीनमधूनच कसे येतात?
१४० कोटीच्या या देशात या व्हायरसचे दोन रुग्ण बेंगळुरू तसेच चेन्नईत (Chennai) तसेच अहमदाबाद येथे एका बालकाला म्हणजे एकंदरीत केवळ ३ रुग्णांना याची लागण झाल्याचे सांगत ऊर बडवून घेणे सुरू केले आहे. वास्तवात चीनमध्ये जनजीवन सामान्य असून तेथे कोणीही रुग्ण नसल्याचे नागपूरच्या अतुल मिश्रा यांनी सांगितले. चीनच्या नावावर हे सर्व याकरिता खपवले जाते की चीनमध्ये ना हिंदी ना इंग्रजी कुणाला समजत आणि भारतात ना चिनी कुणाला समजत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार हा विषाणू आधीपासूनच जगभरात अस्तित्वात आहे. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही बाब स्पष्ट केली. कर्नाटक सरकारनेही चिंता बाळगण्याचे कारण नसल्याचे सांगून याबाबत निर्माण केल्या जात असलेल्या भीतीची हवाच काढून टाकली आहे.
नागरिकांचे मूळ समस्यापासून लक्ष विचलित करण्याचे नवे कारस्थान
पण काही सरकारमान्य आणि फार्मा कंपनीचे आज्ञापालक गोदी मीडिया याबाबत ‘बाबा वाक्य प्रमाण’ सूत्राने दहशत पसरविणे सुरूच ठेवत आहे. हिवाळ्याच्या अखेरीस नेहमीच होणाऱ्या सर्दी पडशासारखा हा विषाणू पसरतो तसेच तो २००१ मध्ये पहिल्यांदा मिळाला होता. मग तो आताच चीनमधून आला, हा नाही. आता नागरिक लाईट थापाडेपणा कशाकरिता हेही विचारले जात आहे. सर्दी, नाकातून पाणी वाहणे, घसा खवखवणे, किंचित ताप हीच त्याची लक्षणे असून हा सर्दीपासून वेगळा तसेच अपायकारक नाही, हे पुन्हा सांगायची वेळ आली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने (Department of Health) संसर्गाच्या आकडेवारीचे तुलनात्मक विश्लेषण केले असता, २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये श्वसन विकारात कोठलीही वाढ झाली नसल्याचे सांगितले आहे.
एचएमपीव्ही विषाणू अनेक वर्षांपासून हिवाळ्यात जगात पसरतोच
पण गोदी मीडिया नागरिकांच्या मनात एचएमपीव्ही व्हायरसच्या नावाने दहशत पसरवून फार्मा कंपन्यानी (Pharma Companies) दिलेल्या आदेशावर हुकूम काम करीत आहे. एचएमपीव्ही विषाणू अनेक वर्षांपासून हिवाळ्यात जगात पसरतोच आणि त्याच्या अँटी बॉडीज म्हणजे रोग प्रतिकार शक्ती भारतीयांमधे विकसित झाली आहे, असेही स्पष्ट केले गेले आहे. कोविड १९ सारखी परिस्थिती नसल्याचे सांगून नागरिकांनी याच्या दहशतीत राहूनये असेही स्पष्ट केले गेले आहे. आयसीएमआरने (ICMR) श्वासोश्वासाच्या विषाणूंवरील उपलब्ध माहितीचे पुनरावलोकनही केले आहे. नागपुरात तर दोन मुलांना या विषाणूची लागण झाली ते दोन्ही मुले घरगुती उपायांनी ठणठणीत झाले, त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे अवेकन इंडिया मुव्हमेंटने आणि युनिव्हर्सल हेल्थ ऑरगॅनायझेशने आवाहन केले आहे.