भिवापूर तालुक्यातील बेसूर येथील घटना
मालेवाडा (Truck Accident) : येथून जवळच असलेल्या बेसूर येथील सती माय परिसरात ट्रकच्या धडकेत दहा गाईंचा मृत्यू झाला तर पंधरा गाई जखमी झाले आहेत सदर घटना आज सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान घडली. एम एच सी डी 5842 क्रमांकाचा ट्रक उमरेड वरून हिंगणघाट कडे कोळसा घेऊन जात होता. दरम्यान बेसूर येथील गाई चरण्याकरिता जात असताना गाईच्या कडपामध्येच ट्रक अनियंत्रित होऊन घुसला त्यामुळे जागीच दहा गाई या मृत्युमुखी पडल्या तर पंधरा गाईंच्या वर जखमी झाले आहेत.
संताप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको
घटनेची माहिती मिळताच पोलीस व गावकऱ्यांनी घटनास्थळावर गर्दी केली असून मागील चार तासापासून संताप्त नागरिकांनी रास्ता रोको केला आहे हिंगणघाट उमरेड मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद असून गाईंच्या नुकसानीची भरपाई ट्रक मालक जोपर्यंत घटनास्थळी येऊन देत नाही तेव्हापर्यंत आम्ही घटनास्थळ हटणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे घटनास्थळी माजी आमदार राजू पारवे ,सुधीर पारवे, संजय मेश्राम उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे दरम्यान अजूनही या ठिकाणी तणावाची परिस्थिती कायम आहे.