पुसद (Yawatmal):- शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कोपरा फाट्याजवळ दि. 23 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता च्या दरम्यान एसटी बस व बोलेरो पिकप वाहनाची समोरासमोर धडक बसली. या गंभीर धडकेत तीन जण गंभीर जखमी झाले. अशी प्राथमिक माहिती गावकऱ्यांकडून समोर आली आहे. बोलेरो पिकप वाहनाच्या चालकाचे नाव अद्याप कळले नाही.
गंभीर धडकेत तीन जण गंभीर जखमी
मात्र या दुर्घटनेत त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर(Fracture) झाल्याची माहिती कळत आहे. एसटी बस मधील दोन प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे मात्र त्यांचे नाव कळू शकले नाही. प्राप्त माहितीनुसार कंधार आगाराची एसटी बस क्रमांक एमएच -20 / सी.एल. 3539 क्रमांकाच्या बसमधून बस चालक मारोती माधव नागरगोजे हे तेरा प्रवासी घेऊन पुसद कडे येत होते. या बसला कोपरा फाट्याजवळ उमरखेड कडे बोलेरो पिकप क्रमांक एमएच -29 / एसटी 0580 च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट बोलेरो पिकप (Bolero pickup) वाहन बस वर आदळले या धडकेत बोलेरो पिकप वाहनाचे मोठे नुकसान झाले एसटी बसचे ही एक लाख रुपयाचे नुकसान झाले. अपघात होताच नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिका (Ambulance) व पोलिसांना घटनास्थळी बोलावून गंभीर जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. या अपघात प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.