नागपूर (Nagpur Accident): नागपूरातील वाठोडा दहन घाट चौकात आज दुपारी भीषण अपघात (Nagpur Accident) घडला. रास्ता ओलांडताना एक वयस्क महिलेचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतक महिलेला पंचनाम्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Wathoda Police) वाठोडा पोलिस पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठोडा रहवासी सुमन गजानन ठाकरे (74) , गजानन नगर, वाठोडा लेआऊट नागपूर, ही महिला रास्ता ओलांडताना समोरून येणाऱ्या ट्रेलर ट्रॅकने चिरडले. या (Nagpur Accident) अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने परिसरात गोंधळ उडाला. अपघात घडताच ट्रक चालक घटना स्थळावरून पसार झाला. (Wathoda Police) वाठोडा पोलिसांनी अपघात स्थळ पोहचून, या (Nagpur Accident) अपघाताची दाखल घेतली. मृतक महिलेला पंचनाम्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.