सिंदेवाही (Two-wheeler Accident) : पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या नवरगाव – सिन्देवाही मार्गावरील अंतरगाव जवळ झालेल्या दुचाकीच्या अपघातात १ व्यक्ती उपचारा दरम्यान ठार झाला तर एक व्यक्ती जखमी झाल्याने खळबळ उडाली आहे. (Two-wheeler Accident) अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव ताराचंद तुकाराम झोडे (५०) असून जखमी इसमाचे नाव कचरू श्रीरामे (५५) असून दोघेही अंतरगाव येथील रहिवासी आहेत.
बुधवारला सायंकाळी ७ वाजता ताराचंद आणि कचरू हे (Two-wheeler Accident) दोघेही दुचाकीने अंतरगावला जात असतांना नवरगाव – सिंदेवाही मार्गावर रस्त्याच्या कडेला हार्वेस्टरची ट्राली उभी असतांना दुचाकी स्वाराचे संतुलन बिघडल्याने उभ्या ट्रालीला धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना सिंदेवाही रुग्णालयात नेले असता परिस्थिती गंभीर वाटल्याने चद्रपूर – वरून नागपूला हलविण्यात आले.