चिखली (Buldana) :- तालुक्यांतील मेरा बु गावाची भीषण पाणी टंचाई पूर्वी पासून गावकऱ्यांच्या पाचवीला पुजलेली असायची त्यामुळे गावात पाणी विक्री करणारे टँकर एकमेकात चढाओढ करून गल्लोगल्लीत पाणी विक्री करत होते. यांचा भुर्दंड गोरगरीबांना जास्त सोसावा लागत असे परंतु सौ अनिता लक्ष्मण वायाळ यांनी सरपंच पदाचे सूत्र स्वीकारताच एक मोठा निर्णय घेतला आणि गावाला लागलेला भीषण पाणी टंचाईचां (Severe water shortage) कलंक पुसून टाकत संपूर्ण गावाला दररोज मोफत पिण्याचे पाणी सोडल्या जात आहे.
मेरा बु गावाला मोफत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा
चिखली तालुक्यातील मेरा बु गावाची लोकसंख्या १५ हजाराच्या जवळपास असून गावात सर्व जातीधर्माच्या लोकांचें वास्तव्य आहे. पूर्वी या गावाला शिंदी वरुण पाणी पुरवठा केल्या जात होता. परंतु गावाची तहान भागविल्या जात नव्हती म्हणून ही योजना काही वर्षांतच बंद पडलीआणि ग्रा. प. ने मेंडगाव धरणात विहीर खोदून नळ योजनेद्वारे गावात पाणी सोडले आणि ही योजना काही दिवस सुरू राहिला आणि लवकरच गुंडाळली. त्यामुळे गावकऱ्यांची भीषण पाणी टंचाई पूर्वी पासून व त्यांच्या पाचवीलाच पुजलेली असायची.पाणी टंचाई पाहून गावातील अनेकांनी टँकर द्वारे घरोघरी दोन रूपये हांडा पाणी विकणे सुरू केले. दररोज विकत पाणी घ्यावे लागत असल्याने गोरगरिबांची मजुरी ही पाण्यामध्येच खर्च होत असे . त्यामुळे गावकऱ्यांची भीषण पाणी टंचाई लक्षात घेता आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी शासना कडून सात कोटी रुपयांची पाणी फिल्टर योजना दे मही खडकपूर्णा प्रकल्पा वरुण मंजूर करून दिली. परंतु ही योजना काही महिने सुरू झाली परंतु पाईप लाईन ही पीव्हीसी पाईपची (PVC pipe) असल्याने वारंवार ठिकठिकाणी लिकिज होवून फुटत होती.
ग्रा. प. ला दुरूस्तीवर जास्त खर्च करावा लागत होता आणि गावाला पाणी मिळत नसे
त्यामुळे ग्रा. प. ला दुरूस्तीवर जास्त खर्च करावा लागत होता आणि गावाला पाणी मिळत नसे. परंतु गेल्या तीन वर्षां अगोदर ग्रा. प. ची निवडणूक झाली आणि गावकऱ्यांनी सौ अनिता लक्ष्मण वायाळ यांना सरपंच पदाच्या खुर्चीवर बसविले. यांच्या पुढे भीषण पाणी टंचाईचां मोठा उभा होता परंतु सरपंच महिलेचे पती हे अत्यंत मेहनती असल्याने त्यांनी मेंडगाव धरणातून जुनी नळ योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि खांद्यावर टिकास, फावडे घेवून ज्या ठिकाणी पाईप लीकिज होईल त्या ठिकाणी स्वत: खोदून लिकिज काढण्याचे काम सुरू केले. सतत रात्र दिवस जिवाची पर्वा न करता गावात पाणी आनले. विहिरीत पाणी साठा कमी पडू नये यासाठी त्यांनी विहिरी लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहण करून विहिरीत पाणी सोडले. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून गावात दररोज प्रत्येक घरोघरी पिण्याचे पाणी सोडल्या जात आहे.
दररोज गावात पाणी सोडल्या जात असल्याने गावात सुरू असलेले टँकर लोकांनां बंद करावे लागले
दररोज गावात पाणी सोडल्या जात असल्याने गावात सुरू असलेले टँकर लोकांनां बंद करावे लागले. त्यातच सरपंच महिलेने गेल्या तीन वर्षांपासून गावकऱ्यांना मोफत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवला आहे. एवढ्यावरच न थांबता सरपंच महिलेने पुन्हा खडकपुर्णा प्रकल्पातून गावात आनलेली पाणी फिल्टर योजना ही सुरू करण्यासाठीं राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांच्याकडे मागणी केली असता लगेच गजानन वायाळ यांनी पुन्हा आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याकडून लोखंडी पाईप लाईन योजना मंजूर करून घेतली त्यामुळे आता मेरा बु गावाला लागलेला भीषण पाणी टंचाईचां कलंक सरपंच सौ अनिता वायाळ आणि राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांनी कायमचा पुसून टाकला असल्याने संपूर्ण गावकरी या दोघांचे कौतुक करत आहेत.