नवी दिल्ली/मुंबई (PM Modi Threat) : दिल्ली निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाल्यानंतर, (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी, मुंबई पोलिसांना (Mumbai Police) धमकीचा फोन आला. या कॉलमध्ये असा दावा करण्यात आला होता की, (Terrorist Threat) दहशतवादी पंतप्रधान मोदींच्या विमानावर हल्ला करू शकतात. या कॉलनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि तातडीने तपास सुरू करण्यात आला.
Highlights from the programmes in Paris yesterday, including the AI Action Summit, India-France CEO Forum and various meetings… pic.twitter.com/O4qcGWL15z
— Narendra Modi (@narendramodi) February 12, 2025
प्रत्यक्षात, मुंबई पोलिस (Mumbai Police) नियंत्रण कक्षाला 11 फेब्रुवारी रोजी एक फोन आला, ज्यामध्ये (PM Modi) पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यादरम्यान त्यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला होता. पोलिसांनी हा कॉल गांभीर्याने घेतला आणि तपास सुरू केला. संबंधित सुरक्षा यंत्रणांना तात्काळ सतर्क करण्यात आले. पोलिसांनी फोन करणाऱ्याला, जो मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे सांगितले जाते, त्याला ताब्यात घेतले आहे.
पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा
पंतप्रधान मोदी (PM Modi) फ्रान्स आणि अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी प्रथम फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. त्यानंतर पॅरिसमध्ये AI अॅक्शन समिट (AI Action Summit) आणि इंडिया-फ्रान्स सीईओ फोरमचे सह-अध्यक्षपद भूषवले.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याशी भेट:
AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतातील शक्यतांवर चर्चा करण्यात आली. “डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन” (Digital Transformation) वर गुगल आणि भारत यांच्यातील संयुक्त सहकार्याबद्दल चर्चा झाली.
योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या (Terrorist Threat) मिळाल्या. धमकी देणारा व्यक्ती मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील 20 वर्षीय तरुण सुनील गुर्जर होता. यूपी एसटीएफ आणि सायबर टीमने मोबाईल लोकेशन ट्रेस केले आणि आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, “त्याला देशातील सर्वात मोठा डॉन बनायचे आहे”. आरोपीला कोणत्याही दहशतवादी संघटनेकडून निधी मिळाला आहे का?, हे शोधण्यासाठी पोलिस त्याचे बँक खाते आणि कॉल डिटेल्स तपासत आहेत.
दिल्लीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर आणि (PM Modi) पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यापूर्वी सुरक्षा सतर्कता वाढवण्यात आली आहे. एकीकडे पंतप्रधान मोदींच्या विमानावर (Terrorist Threat) दहशतवादी हल्ल्याचा धोका असताना, दुसरीकडे योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांना धमकी देणाऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली. कोणताही धोका टाळता यावा, म्हणून सुरक्षा संस्था प्रत्येक मार्गातून तपास करत आहेत.