स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला पकडले
हिंगोली (Hingoli Crime Case) : औंढा नागनाथ तालुक्यातील कुंडकरपिंपरी येथे एक २५ वर्षीय युवक दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने कंबरेला खंजर लावून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जावून त्याला खंजरसह पकडले.
कुंडकर पिंपरी येथील कुंडलीक उर्फ सचिन त्र्यंबक कुंडकर हा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने (Hingoli Crime Case) कंबरेला खंजर लावून फिरत असल्याची माहिती सोशल मिडियावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यावरून पथकाने तात्काळ घडनास्थळी जावून पाहणी केली असता कुंडलीक उर्फ सचिन कुंडकर याच्या कंबरेला खंजर मिळून आल्याने त्याला तात्काळ ताब्यात घेतले. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसात बालाजी मुंढे यांंनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
हि कारवाई पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, (Hingoli Crime Case) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डि.आर. मोरे, बालाजी मुंढे, निरंजन नलवार, संदिप जाधव, धनंजय क्षीसागर यांच्या पथकाने केली आहे.


