Akola:- पातूर साठवलेल्या पाण्यापासून होतं असलेले मुख्य आजार डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया (Chikungunya) या आजारावर मात करण्याकरिता अकोला जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पातूर नगरपरिषद(municipal council) मुख्याधिकारी सय्यद ऐसा नोद्दीन यांनी पातुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे (Health Centers) आरोग्य अधिकारी कर्मचारी व नगरपरिषद कर्मचारी यांच्या सहा समूह टीम तयार करून पातुर शहरातील घरघर पाणी साठवण तपासणी तसेच आरोग्य तपासणीची सुरुवात केली आहे.
घरं घर पाणी तपासणी योजनेची केली सुरवात
यामध्ये साठवलेले पाणी ज्या पासून मुख्य आजाराचे निर्माण होणारे डास पासून पातुर शहर मुक्त होण्याकरिता जनजागृती, आरोग्य तपासणी, तसेच सांडपाणी फवारणी, उपाय योजना राबविण्यात आल्या व आज पातुर शहरांमध्ये विविध भागांमध्ये टीम वर्क करून नागरिकांच्या आरोग्य विषयी दखल घेतली व संशयित रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये पाठवून त्यांच्यावर औषध उपचाराची सुरुवात करण्यात आली.