लातूर (Latur) :- मराठी भाषेविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांचा लातूर जिल्हा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्यावतीने येथील महात्मा गांधी चौकात शुक्रवारी (दि.७) निदर्शने करून जाहीर निषेध करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
लातूर मध्ये मराठी भाषेविषयी वादग्रस्त वक्तव्याबद्दल जाहीर निषेध
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलीच पाहिजे, असे नाही, असे वक्तव्य करून मराठी भाषेचा व मराठी माणसाचा अपमान केला आहे. या वक्तव्याचा निषेध म्हणून जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी लातूरच्या महात्मा गांधी चौकात जोशी यांच्या विरोधात घोषणाबाजी देत निषेध आंदोलन करण्यात आले. भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी संतोष सोमवंशी यांनी यावेळी बोलताना केली. या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्यासह शिवसेना सहसंपर्कप्रमुख नामदेव चाळक, महानगर प्रमुख सुनील बसपुरे, महिला जिल्हा संघटक सौ. सुनीता चाळक, उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव, सी. के. मुरळीकर, शहरप्रमुख विष्णू साठे, रमेश माळी, एस. आर. चव्हाण, बसवराज मंगरूळे,माधव कलमुकले, शंकर रांजणकर, विलास लंगर, कैलास पाटील, दत्तु मोरे, भास्कर माने, सुरज बाहेती, मारुती सुर्यवंशी, मारुती सांवत, राजू कतारे, राजू घटमल, रोहित दोपारे, गणेश गंगणे, प्रदीप बनसोडे, विष्णू कांबळे, कृष्णा जाधव, प्रेम शाहीर, राम चोथवे, सोमनाथ आग्रे, परमेश्वर कांबळे, अभिजित गायकवाड यांचेसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.