दारव्हा (Yawatmal):- दारव्हा ठाणेदाराच्या शासकीय निवासस्थानातून(Government residence) साडेतील लाखांची रोख चोरी गेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याबाबत ठाणेदारांनी दुजोरा दिला मात्र तक्रार(complaint) दाखल करण्यात आलेली नाही. संपुर्ण तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षेची प्रमुख जबाबदारी असलेल्या ठाणेदाराच्याच घरी चोरी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी विश्वास करावा कुणावर असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दारव्हा ठाणेदाराच्या निवासस्थानातून साडेतीन लाखांची चोरी
दारव्हा पोलीस स्टेशनला ठाणेदार म्हणून पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात चोरांनी धुमाकूळ घातला आहे. अनेक चोरी(Robbery), घरफोडीच्या घटनांचा आजही उलगडा झालेला नाही. त्यातच आता चक्क ठाणेदाराच्या शासकीय निवासस्थानातून तब्बल साडेतीन लाख रुपयांची रोख चोरी गेल्याची माहिती समोर आल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान ठाणेदार कुलकर्णी चोरीच्या घटनेला दुजोरा दिला आहे, मात्र ७० हजार रुपयेच चोरी गेल्याचे त्यांनी सांगितले. मागील आठवड्यात रजेवर गेलो होतो. घराची चावी कामगाराकडे होती. सदर कामगार रुटीन कामकाज करतो. त्यामुळे चावी त्याच्याकडेच राहायची. रजेवरून परत आल्यानंतर घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले नाही. रुटीन कामकाज सुरूच होते. दरम्यान पैशाचे काम पडल्यानंतर घेण्यासाठी गेलो असता ७० हजार रुपये चोरी गेल्याचे लक्षात आले. कामगाराला याबाबत विचारणा करणार तर त्याला सर्पदंश(snakebite) झाल्याने तो रुग्णालयात(Hospital) भरती असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणात तक्रार अद्याप दिली नसल्याचेही ठाणेदारांनी सांगितले.