मानोरा(Washim):- महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या विरोधात दि. २४ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून महायुती सरकारचा निषेध(Prohibition) नोंदवून तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
या घटनामुळे महिला व मुली सुरक्षित नाहीत
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या (Atrocities) घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या घटनामुळे महिला व मुली सुरक्षित नाहीत असे सिद्ध होते. नुकतेच बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेचा निषेध तथा महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या विरोधात महायुती सरकारचा महाविकास आघाडीने निषेध नोंदविला. यावेळी माजी आ. अनंतकुमार पाटील, अनिल राठोड, डॉ श्याम जाधव, अरविंद इंगोले, भोजराज चव्हाण, काशीराम राठोड, रवींद्र पवार, सुनिल जामदार, इम्रान फकीरवले, राधेशाम राठोड, भावराव चव्हाण, मानकर, गजानन पाटील, भगवान पिंगाने आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.