परभणी/असोला (Parbhani):- परभणी तालुक्यातील असोला येथून जवळच असलेल्या नांदगाव खु.येथील २० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार १९ जानेवारी रोजी रात्री घडली. ओंकार प्रकाशराव भालेराव असे मयत युवकाचे नाव आहे. युवकाच्या आत्महत्येचे(Suicide) नेमके कारण समजू शकले नाही. सदर प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात सोमवार दुपारपर्यंत नोंद झाली नव्हती.
परभणी तालुक्यातील नांदगाव खु. येथील घटना आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट..!
या घटनेविषयी अधिका माहिती अशी की, पूर्णा पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या परभणी तालुक्यातील नांदगाव खू.येथील पाटीवर असलेल्या हॉटेलमध्ये रविवारी रात्री ओंकार भालेराव हा युवक गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली. पोलीस अंमलदार शाम काळे, मंगेश जुमडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात पाठविला. युवकाच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. पूर्णा पोलीस अधिक तपास करत आहेत.