…अखेर रामलीला मैदानावरील गिट्टी हटविण्यास प्रारंभ
हिंगोली (Hingoli Players) : खेळाडूंसाठी अडथळा ठरणारी रामलीला मैदानावरील गिट्टी हटविण्याच्या मागणीची दखल प्रशासनाने घेत ४ डिसेंबरपासून या कामाला प्रारंभ केला आहे. त्यामुळे खेळाडू, नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर ऑक्टोबरमध्ये ऐतिहासीक दसरा महोत्सवादरम्यान पाऊस झाल्यास चिखल निर्माण होऊ नये याकरीता गिट्टी पसरविण्यात आली होती. परंतु, दसरा महोत्सव साजरा झाल्यानंतर गिट्टी तशीच पडून होती. दरम्यानच्या काळात ही गिट्टी वर आल्याने त्यावरून चालणे देखील कठिण झाले होते. सकाळी, सायंकाळी (Hingoli Players) खेळाडू विविध खेळ खेळण्यासह व्यायामासाठी येतात. परंतु, मैदानावरील गिट्टीमुळे त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे खेळाडू, नागरिकांची गर्दी संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर होत आहे.
मात्र, हे मैदान पोलिस प्रशासनाच्या ताब्यात असल्याने तेथे अडचणींचा सामना करावा लागतो. तर जि. प. बहुविध प्रशालेच्या मैदानावरही (Hingoli Players) खेळाडू, व्यायाम करण्यासाठी आलेल्या तरूणांची नेहमीच गर्दी असते. त्यामुळे रामलीला मैदानावरील त्रासदायक ठरणारी गिट्टी हटवून हे मैदान पूर्ववत करावे, अशी मागणी होत होती. या मागणीची प्रशासनाने दखल घेत बुधवारी दुपारपासून गिट्टी हटविण्याच्या कामाला सुरूवात केली. त्यामुळे खेळाडू, नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.