नांदेड(Nanded) :- 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी नांदेड जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन परिसरात सर्व मतयंत्र स्ट्रॉंगरूममध्ये(Strongroom) सुरक्षित ठेवण्यात आले असून याच ठिकाणी मतमोजणी सकाळी आठ वाजता पासून सुरू होणार आहे.
९६ टेबलवर नांदेडमध्ये होणार मतमोजणी
मतदान प्रक्रियेच्या तुलनेत मतमोजणी प्रक्रियेसाठी कमी कर्मचारी लागतात. मात्र जवळपास 500 कर्मचारी आतमध्ये या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी असतील. तेवढेच पोलीस अधिकारी (police officer) कर्मचारी सुरक्षा यंत्रणे संदर्भात काम करणार आहे. नांदेड जिल्ह्यात सहा विधानसभा (Assembly) क्षेत्र आहेत. एका विधानसभा साठी 14 टेबल असे एकूण 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे. याशिवाय पोस्टल बॅलेटसाठी १२ टेबल आहेत. थोडक्यात नांदेड जिल्ह्याची मतमोजणी(counting of votes) 96 टेबलवर होणार आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात किती केंद्र आहे त्याला भागीले टेबलची संख्या यावरून फेऱ्या ठरतात. उदाहरणार्थ 87 नांदेड विधानसभा क्षेत्रात 312 मतदान केंद्र आहेत. त्यामुळे 312 भागीले 14. बरोबर 22.28 म्हणजे 23 फेऱ्या होतील. थोडक्यात नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी 23 तर सर्वात अधिक 26 फेऱ्यानंतर पूर्ण निकाल लागेल.