परभणी (Parbhani): आरटीई (RTE)२५ टक्के सन २०२४- २५ अंतर्गत सर्व शाळांमध्ये नियमाप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Nationalist Congress Party) ओबीसी विभागातर्फे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना देण्यात आले.
२५ टक्के नियमाप्रमाणे या ठिकाणी २५ लाभार्थ्यांची निवड होणे अपेक्षित
बर्याच शाळांमध्ये शंभर पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या आहे. २५ टक्के नियमाप्रमाणे या ठिकाणी २५ लाभार्थ्यांची निवड होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात दहा ते बारा लाभार्थ्यांचीच निवड झाली आहे. शासन दरबारी या शाळांमध्ये एकाच तुकडीची नोंद आहे. प्रत्यक्षात विद्यार्थी जास्त आहेत. आरटीईच्या प्रवेशासाठी निवड व्हावी म्हणून चुकीचा भाडे करारनामा लावून चुकीचे लोकेशन दाखविण्यात आले आहे. त्यामुळे गरजवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान (Educational loss)होत आहे. या प्रकाराची चौकशी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू असून यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडत आहे. पालम, विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.