परभणी/जिंतूर (Parbhani):- मराठा समाजाला ओबीसीतून (OBC)आरक्षण नको या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे जालन्यातील वडीगोद्री येथे उपोषणाला बसले होते. उपोषणाचा दहाव्या दिवशी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आश्वासन देऊन उपोषण स्थगित केले होते. उपोषणानंतर त्यांची प्रकृती काहीशी खालावली असल्याने त्यांना दवाखान्यात(Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर समाजाच्या भेटीगाठी साठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांना नुकतेच दवाखान्यातून डिस्चार्ज(Discharge) मिळाला आहे.
संवाद यात्रेदरम्यान ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा आरोप
त्यानंतर आजपासून त्यांनी आपल्या अभिवादन दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी आज गुरुवार 27 जून रोजी त्यांचा संवाददौरा जिंतूर येथे आला असता त्यांच्या संवाद यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी जेसीबी (JCB)द्वारे फुलांची उधळण करण्यात आली या संवाद यात्रेदरम्यान बोलताना नवनाथ वाघमारे यांनी सरकारवर घणाघात करत मराठा समाजाच्या आंदोलनाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) व राजेश टोपे यांनीच केली असल्याचा आरोप यावेळी बोलताना केला आहे. शिवाय मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास राजकीय पक्षातील लोकांना याचा फायदा घेण्यासाठी मोठे षडयंत्र आहे. म्हणून ओबीसी बांधवांनी आपली ताकद दाखवून राज्य सरकारला धडा शिकवावा लागेल असेही यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान, संवाद यात्रेतील लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांचे स्वागत सुरेश नागरे यांनी केले. यावेळी सकल ओबीसी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके म्हणाले की, सरकार सगे सोयरे अंमलबजावणीचा कुठल्याही प्रकारचा अध्यादेश काढणार नसून याबाबत सरकारच्या शिष्टमंडळा सोबत बोलणे ही झाले आहे.शिंदे सरकार हे ओबीसी समाजाच्या विरुद्ध काम करत असून या सरकारला गुहाटीला पाठविण्याची तयारी करा असे यावेळी बोलताना लक्ष्मण हाके यांनी सांगितले.