परभणी/राणीसावरगाव(Parbhani):- राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister)अजित पवार (Ajit Pawar)यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही महत्वकांक्षी योजना जाहीर केली. दर महिन्याला पंधराशे रुपये पात्र लाभार्थी महिला व युवतीच्या बँक खात्यात (Bank account) जमा होणार आहेत.
महिला आणि युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा- कृष्णा शिवाजीराव दळणर
जिल्ह्यातील सर्व पात्र महिला आणि युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रायुकाँचे जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा शिवाजीराव दळणर यांनी केले. स्त्री- पुरुष समानता निर्माण करणे आणि सर्व महिला आणि मुलींना सक्षम करणे हे शाश्वत विकास ध्येयांपैकी एक ध्येय आहे. राज्य शासनाने ७ मार्च रोजी चौथे महिला धोरण जाहीर केले. त्यानुसार राज्यशासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी ही महत्वकांक्षी योजना जाहीर केली. या योजनेचा लाभ महिलेने घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे (nationalist) युवा नेते कृष्णा दळणर यांनी केले आहे.
रायुकाँचे कृष्णा दळणर यांचे आवाहन
महायुतीचे सरकार अनेक लोकपयोगी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करीत आहे. राज्यातील असंख्य महिलाना लाभ होत आहे, यातून सर्वसामान्य नागरिकांचा उत्कृष होत असून महाराष्ट्र राज्य (State of Maharashtra) प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनात अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली