तुमसर (Bhandara) :- कौटुंबिक वादातून बापाने मुलाच्या कुर्हाडीने मानेवर वार करुन हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना दि.१० ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २.३० वाजतादरम्यान उघडकीस आली. धनराज ठाकरे (६१), असे आरोपी वडीलाचे नाव आहे. तर मुलगा एकनाथ धनराज ठाकरे (४०), असे मृतक मुलाचे नाव आहे.
तुमसर तालुक्यातील रोंघा येथे धनराज ठाकरे हा शेतीचे काम करीत होता. त्याचा मोठा मुलगा एकनाथ हा पाटबंधारे विभागात कार्यरत होता. तर लहान मुलगा हा मुंबईला नोकरीवर आहे. वडील धनराज व मुलगा एकनाथ यांच्यामध्ये कौटुंबिक वादातून नेहमीच भांडण होत असे. दि.१० ऑगस्ट रोजी धनराज हा घरी आला असता दरम्यान मुलात व वडीलात कौटुुंबिक वाद झाला असून वडीलाने मुलाच्या मानेवर कुर्हाडीने(ax)वार करुन हत्या केली. मुलगा एकनाथ हा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. घटनेची माहिती गावकर्यांना मिळताच गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती गोबरवाही पोलीसांना देण्यात आली. माहिती मिळताच गोबरवाही ठाण्याचे ठाणेदार विनोद गिरी व आंधळगाव ठाण्याचे ठाणेदार पोनि सोनवाने, हे घटनास्थळावर दाखल झाले. पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला असून प्रेत शवविच्छेदनाकरीता(Autopsy) पाठविण्यात आले.