Washim (कारंजा) :- मागील काही वर्षांत गर्भलिंग निदान(Pregnancy diagnosis) करून स्त्रीभ्रूणहत्येचे (Feticide) प्रमाण वाढल्याने प्रति हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे आरोग्य विभागाने मुलींचा वाढविण्यासाठी जन्मदर व्यापक प्रमाणात जनजागृती केली आणि शासनाने बेटी बचाओ बेटी पढाओ यासारखे उपक्रम राबविल्याने सन २०२४ या वर्षात कारंजा तालुक्यात मुलींचा जन्मदर वाढल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते. सन २०२४ मध्ये कारंजा तालुक्यात २१६० बालकांचा जन्म झाला त्यात मुलींचे प्रमाण १०५१ एवढे आहे. तर मुलींचा जन्मदर हा प्रति हजार मुलांमागे ९५५ एवढा असल्याचे दिसून येते.
‘बेटी बचाव बेटी पढाओ’चा फायदा
मुलीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते शिवाय तिच्या घरी येण्याने घरात समृद्धी येते असे सुद्धा मानले जाते त्यामुळे लक्ष्मीच्या पावलांनी घरी समृद्धी आणणाऱ्या मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी आरोग्य विभागाकडून(Department of Health) प्रत्येक वर्षी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२४ मध्ये देखील गर्भलिंगनिदान चाचणीवर नियंत्रण मिळवून स्त्री भ्रूण हत्या रोखणे, बेटी बचाव, बेटीपढाव अभियानाची चोख अंमलबजावणी करण्यात आली. आणि त्याचाच परिणाम म्हणून कारंजा तालुक्यात मुलींचा जन्मदर वाढला. पुर्वीच्या काळात मुलगी घरात जन्माला येणे अनेकांना नकोसे होते. परंतु अलिकडच्या काळात हे चित्र पूर्णतः बदलले. त्यामुळे आई- वडिलांकडून मुलीच्या जन्माचे धडाक्यात स्वागत व्हायला लागले.
एवढ्यात मुलगा-मुलगी हा भेदभाव संपुष्टात आल्याचे दिसत आहे
स्त्रीभृण हत्येवरिल नियंत्रणासह महिलांचे समाजातील महत्त्व पटवून देण्याबाबत आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभागाकडून व्यापक जनजागृती केली जात आहे. आणि याचीच फलश्रुती म्हणून मुलींच्या जन्मदरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.