परभणी/गंगाखेड(Parbhani):- कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काळवीटाचे प्राण वाचवून खळी येथील ग्रामस्थांनी काळवीटास सुखरूप वन विभागाच्या सुपूर्द केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील खळी शिवारात असलेले काळवीट चुकून गावठाण हद्दीत आल्याने मोकाट कुत्र्यांनी काळवीटाचा पाठलाग केला तेंव्हा जागा दिसेल तिकडे काळवीट पळत सुटले यातच त्याच्या एका पायाचे खुर तुटून पायाला जखम झाली व पायाच्या खुरामधून रक्त येत असल्याचे काही ग्रामस्थांना दिसल्याने तुकाराम सुरवसे, शेख सलीम, रामभाऊ सावळे, अरुण रेंदास, माऊली घुलेश्वर, संतोष सोन्नर, विठ्ठल पिसाळ आदींनी कुत्र्यांना(dogs) हुसकावून लावत जखमी अवस्थेतील काळवीटाची (blackbird) कुत्र्यापासून सुटका करत काळवीटाचे प्राण वाचवून त्यास एका वाहनांमध्ये ठेवत याची माहिती पोलीस पाटील पुंडलिक सुरवसे यांना दिली त्यांनी ही माहिती वन विभागातील (Forest Department) वनरक्षक रेखा भेंडेकर यांना दिली. असता वन परिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वन रक्षक रेखा भेंडेकर, लक्ष्मण राठोड, शाम भराडे, माणिक इंगोले यांनी तातडीने खळी येथे जाऊन जखमी काळवीटास ताब्यात घेऊन गंगाखेड येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात काळविटावर उपचार करून सुखरूपपणे त्याला त्याच्या अधिवासात सोडून दिले.