परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime) : रेल्वे स्थानकाच्या प्लेटफार्मवर बुधवार 16 एप्रिल रोजी एका 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी (Gangakhed Crime) रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
गंगाखेड रेल्वे स्थानक प्लेटफार्मवरील पाणी पिण्याच्या नळाजवळ बुधवार 16 एप्रिल रोजी अनोळखी 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. रेल्वे प्लेटफार्मवरील पाणी पिण्याच्या नळाजवळ एक तरुण मृतावस्थेत पडला असल्याची माहिती प्रवाशांनी (Gangakhed Crime) रेल्वे पोलीसांना दिल्याने जमादार मुकुंद परांडे यांनी घटनास्थळी पाहणी करून मृत तरुणाची माहिती काढून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याची ओळख न पटल्यामुळे रेल्वे प्रवासी व खाजगी रुग्णवाहिका चालक दिपक सपकाळ यांच्या मदतीने तरुणाचा मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहात दाखल करण्यात आला.
या (Gangakhed Crime) घटनेने रेल्वे प्रवाशांत खळबळ उडाली असुन रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. काळा सावळा रंग व सडपातळ बांधा असलेल्या मयत तरुणाच्या डाव्या हातावर सुनिता असे नाव गोंदलेले असुन जांभळ्या व पांढऱ्या रंगाचा शर्ट निळसर रंगाचा मळकट रंगाचा जिन्स पॅन्ट असे कपडे असलेल्या अनोळखी तरुणाची ओळख पटविण्यासाठी जमादार मुकुंद परांडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.